तुळसमध्ये जानेवारीत दौड स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळसमध्ये जानेवारीत दौड स्पर्धा
तुळसमध्ये जानेवारीत दौड स्पर्धा

तुळसमध्ये जानेवारीत दौड स्पर्धा

sakal_logo
By

तुळसमध्ये जानेवारीत दौड स्पर्धा
वेंगुर्ले ः वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसतर्फे अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे १ जानेवारीला सकाळी साडेसहाला जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुला पुरुष व महिला, पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी, नववी ते दहावी प्रत्येकी मुली व मुलगे अशा एकूण १२ गटांसाठी आयोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे खुल्या पुरुष गटासाठी १५७५, १०७५, ७७५ रुपये, तर खुल्या महिला गटासाठी अनुक्रमे रोख ६६६, ४४४, ३३३ रुपये तसेच उर्वरित सर्व गटातील विजेत्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र आणि सहभागीं सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहिती व नोंदणीसाठी महेश राऊळ, प्रदीप परुळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
---------------
वेंगुर्लेत वक्तृत्व स्पर्धेस प्रतिसाद
वेंगुर्ले ः आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्लेतर्फे तालुकास्तरीय तिसरे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन २०२२ च्या अनुषंगाने गुरुवारी (ता. ८) बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे आयोजित शालेय व खुल्या अशा दोन गटातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कृपा म्हाडदळकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) हिने, तर खुल्या गटातून निर्जरा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्लेतर्फे तालुकास्तरीय तिसरे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन १० व ११ डिसेंबरला वेंगुर्ले साईमंगल कार्यालयात होत आहे. त्यानिमित्त आयोजित शालेय व खुल्या अशा दोन गटातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.