जिल्ह्यात 2173.19 हेक्टर ओसाड क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात 2173.19 हेक्टर ओसाड क्षेत्र
जिल्ह्यात 2173.19 हेक्टर ओसाड क्षेत्र

जिल्ह्यात 2173.19 हेक्टर ओसाड क्षेत्र

sakal_logo
By

पान ५

जिल्ह्यात २१७३.१९ हेक्टर ओसाड क्षेत्र
---
गळिताची धान्य लागवड कमी; मजुरांची वानवा, कलही कमी
रत्नागिरी, ता. ११ : जिह्यातील पौष्टिक गळिताची धान्य लागवड कमी होत आहे. यामुळेच कोकणातल्या पडीक जमिनींचे प्रमाण वाढत आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामातील कडधान्य पिकांची आणि भाजीपाल्याची लागवड थांबली असून, गावोगावी ओलिताखालच्या जमिनी ओसाड पडण्याच्या प्रमाणात भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात २१७३.१९ हेक्टर पडीक क्षेत्र आहे.
कोकणातली भातशेती आणि त्यानंतर खरीप हंगामात त्याच शेतजमिनीत अंगओलितावर केली जागारी नाचणी, कडवा वाल, पावटा, कुळीथ, तीळ, जवस, चवळी आदी पिकांची लागवड केली जाते. अनेक प्रकारच्या पोषणांनी युक्त असे हे गळिताचे धान्य रोजच्या आहारात सहज उपलब्ध असते. त्यामुळे कोकणातल्या व्यक्तीचा आहार हा खऱ्या अर्थाने समतोल आणि योग्य पोषणांनी युक्त असा आहार असतो. त्यामुळेच रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्याने कोकणी माणूस सहसा संसर्गजन्य आजारांना बळी पडत नाही. मात्र, ही परिस्थिती बदलत आहेत. बहुतांश गावांमध्ये मजूर मिळत नाहीत, परवडत नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले कमी होऊ लागली आहेत. जंगलात वास्तव्य असणारी माकडे आता जवळच्या गावांमध्ये शिरू लागली आहेत. भाजीपाल्याची लागवड झाली असेल तर त्याचा नाश माकडांकडून होतो. त्यामुळे शेतीसाठी केलेली मेहनत वाया जाते. या कारणानेही अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे. पूर्वी ज्या घरांमधून मजूर वर्ग उपलब्ध होत असे, त्या घरातला तरुण आता मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी करण्यासाठी स्थायिक झाला. गावाकडे वळण्याचा शहरातल्या लोकांचा कल वाढत आहे. याचाच दुष्परिणाम म्हणून गावातली भातशेतीची जमीनही बिनशेती करून विकण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच जमिनींचे भावही वधारत आहेत. सरकारच्या योजनांमुळे गहू, तांदूळ, डाळ आता अगदी रास्त दरात स्वस्त धान्य दुकानांत सहज मिळते. त्यामुळे पोटा-पाण्यासाठी शेती हा पर्यायही उरला नाही. इथल्या तरुणाला शेतीत मेहनत करण्यापेक्षा पारंपरिक जमीन विकून पैसे कमविणे सोप वाटते. अशा अनेक कारणांमुळे आता जिल्ह्यातील शेतीचे प्रमाण कमी झाले आहे.


चौकट

तालुका भातशेती क्षेत्र पडीक क्षेत्र

खेड १५२६.७४ ४३२.६३

गुहागर १७११.८७ २६३.६८

चिपळूण २३६२.३४ २८७.६

दापोली २६२९.३८ १५३.८

मंडणगड १४२८.८२ १२०.८३

रत्नागिरी ५२४७.५१ १६२.४९

राजापूर १९९४.५ ९१.२२

लांजा २४१९.३३ २६५.३८

संगमेश्वर ४१८९.८७ ३९३.९४