सात-बारावर नोंदीअभावी भाताच्या विक्रीत अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात-बारावर नोंदीअभावी भाताच्या विक्रीत अडचणी
सात-बारावर नोंदीअभावी भाताच्या विक्रीत अडचणी

सात-बारावर नोंदीअभावी भाताच्या विक्रीत अडचणी

sakal_logo
By

सात-बारावर नोंदीअभावी
भाताच्या विक्रीत अडचणी
ई-पीक पाहणी अहवाल ; हेलपाटे मारावे लागतात
रत्नागिरी, ता. ११ : जिल्ह्यात आधारभूत भावाने भाताची खरेदी करणारी केंद्र सुरू झाली आहेत. भाताचा हमी भावाने दर चांगले असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताची विक्री केंद्रावर जाऊन करीत असतो. मात्र, खरीप हंगामातील पिकाची केलेली ई-पीक पाहणी अहवाल ऑनलाईन पद्धतीने करताना अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद न झाल्याने भाताची विक्री करण्यात अडचणी येत आहेत.
कोकणात पावसाळ्यात प्रामुख्याने भातशेती केली जाते. वर्षभरासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित भाताची शेतकऱ्यांकडून विक्री केली जाते. शासनाने निर्धारित केलेल्या खरेदी विक्री संघात हमी भाव पद्धतीने भाताची खरेदी करण्यासाठी अ वर्गाच्या भाताला २०६० रुपये प्रति क्विंटल तर ब वर्गाच्या भाताला २०४० इतका दर निश्चित केला आहे. त्यामुळे भाताची हमी भाव केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असून, त्यांना आधी आपल्या शेतीच्या सातबारा उतारा, बँक पासबुक, जमिनीचा आठ अ उतारा आधारकार्ड यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक केले आहे. मात्र, ऑनलाईन पीक पाहणी करताना त्यावर क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर न झाल्याने शेतकऱ्यांना भात विक्री करताना हेलपाटे मारावे लागत आहेत.
भाताची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सातबारा उतारा न्यावा लागतो आणि त्या सातबारा उताऱ्यावर २०२२च्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अहवालाची नोंद नसल्यास भाताची खरेदी हमी भाव केंद्रावर केली जात नाही. अहवालाची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर होताना तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे ई-पीक पाहणी होऊन देखील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भातपिकाची नोंद उताऱ्यावर होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने समोर येत आहेत.