कणकवली :पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :पोलिस वृत्त
कणकवली :पोलिस वृत्त

कणकवली :पोलिस वृत्त

sakal_logo
By

६७९१९
प्रवीण घाडीगावकर

हरकुळ बुद्रुक येथून तरुण बेपत्ता
कणकवली ः हरकुळ बुद्रुक (ता.कणकवली) येथून मजुरीसाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. प्रवीण गणेश घाडीगावकर (वय ३८ रा. हरकुळ बुद्रुक बोंडकवाडी ) असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण ८ डिसेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास ‘‘मजुरीसाठी जातो’’, असे सांगून घरातून बाहेर पडला तो अद्याप परतलेला नाही, अशी फिर्याद त्यांची पत्नी पूर्वा यांनी येथील पोलिसात आज दाखल केली आहे. प्रवीण यांची उंची पाच फूट रंग सावळा, पिवळा टी-शर्ट, पांढरी हाफ पॅन्ट, दाढी वाढलेली आहे. माहिती मिळताच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---
कणकवलीत अनोळखी वृद्धाचा मृतदेह
कणकवली ः शहरातील कांबळे गल्ली येथे अनोळखी वृद्धाचा आज मृतदेह आढळला. मृताचे अंदाजे ६० वर्षे असावे. याबाबत कांबळे गल्ली येथील विजयी धोंडू टकले यांनी येथील पोलिसांत खबर दिली. आज सकाळी ते आपले दुकान उघडण्यासाठी कांबळे गल्ली येथील कामतस्मृती बिल्डिंग येथे आले. त्यावेळी सकाळी सातच्या सुमारास मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाच्या अंगावर निळा फुल शर्ट, सफेद पॅन्ट, दाढी वाढलेली, केस पिकलेले, हातात पांढऱ्या रंगाची पिशवी आहे. उंची साधारण पाच फूट आहे. याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.