
बोलक्या भिंतींनी शहराच्या सौंदर्यात पडतेय भर
rat११p२७.jpg
६७८७७
रत्नागिरीः स्वच्छ भारत अभियानाच्यादृष्टीने पालिकेने प्रमुख भिंती रंगवून मार्गदर्शक संदेश दिले आहेत.
------------------
बोलक्या भिंतींनी शहराच्या सौंदर्यात पडतेय भर
स्वच्छ सर्वेक्षणासाठी पालिकेची तयारी; दुतर्फा भिंतीवर चित्रे
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरी पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण ३.० साठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने शहरातील मुख्य मार्गातील प्रमुख भागातील दुतर्फा असणाऱ्या भिंतींवर स्वच्छतेविषयक व उपदेशपर संदेश देणारी विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या बोलक्या भिंतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पाडत आहेत.
सध्या स्वच्छ सर्वेक्षणाचे काम सर्वत्र सुरु आहे. याआधी पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छताविषयक सर्वेक्षणांतर्गत गौरवण्यात आले आहे. देशभरातील निवडलेल्या शहरांमध्ये २५ वा क्रमांक रत्नागिरी शहराचा होता. त्यामुळे चमकदार कामगिरी करण्यासाठी पुन्हा एकदा रत्नागिरी पालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अतंर्गत या भिंती रंगवण्यासंदर्भात ऑगस्ट २०२२ मध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. ज्यात कोल्हापुरातील दिव्य स्वप्न फाऊंडेशनने पुढाकार घेतला. या फाऊंडेशनला काम मिळाल्यावर या फाऊंडेशनच्या माध्यमातून ६ ते ७ जणांची नेमणूक भिंती रंगवण्यासाठी करण्यात आली.
रंगकामासाठी लागणाऱ्या रंगाचा व रंगकाम करणाऱ्यांचा सर्व खर्च है फांऊडेशन देते आहे. हे रंगकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या भिंतीवर रत्नागिरीची वैशिष्टये, प्लास्टिकचा कमी वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्राण्यांचे जतन, स्वच्छतेचे संदेश, यासारख्या बाबतीतील संदेश चित्राच्या माध्यमातून रंगवण्यात येत आहेत. या भिंती पावसाने व ठराविक काळानंतर खराब होतात. त्यामुळे त्या रंगाच्या माध्यमातून यानिमिताने पुन्हा बोलक्या झाल्या आहेत. शहरातील बसथांबे, बसस्थानक, माळनाका, प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेरील भिंती, जिल्हा परिषद कमानीबाहेरील भिंती, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भिंती यासारख्या जास्त वर्दळ असणान्या भागातील भिंती रंगवण्यात येत आहेत. याशिवाय स्वच्छ वॉर्ड स्पर्धाही घेण्यात आली आहे. तसेच आगामी काळात चित्रकला स्पर्धाही होणार आहे. मुख्य मार्गातील दुभाजकामध्ये सुशोभित झाडे लावली आहेत. त्यांची स्वच्छता करून त्यांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर अग्नीशम बंबाने रस्ते देखील स्वच्छ करण्याता येत आहेत.