Tue, Jan 31, 2023

सातार्डा दूरक्षेत्रावर
दारू वाहतूक रोखली
सातार्डा दूरक्षेत्रावर दारू वाहतूक रोखली
Published on : 11 December 2022, 2:58 am
सातार्डा दूरक्षेत्रावर
दारू वाहतूक रोखली
सावंतवाडी, ता. ११ ः बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पणजी येथील सिद्धार्थ भीमाप्पा करजगी याला सातार्डा पोलिस दूरक्षेत्रावर ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १० हजार रुपयांच्या दारूसह मोटार जप्त करण्यात आली. ही कारवाई आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सातार्डा दूरक्षेत्रावर झाली. एका गाडीतून दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती दूरक्षेत्रावरील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संशयित करजगी याची मोटार अडवून तपासणी केली असता त्यात १० हजारांची बेकायदा दारू आढळली. या प्रकरणी त्याची मोटार ताब्यात घेण्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस गुरू नाईक आणि प्रदीप नाईक यांनी केली.