ठाकरे शिवसेना-भाजपमध्ये लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे शिवसेना-भाजपमध्ये लढत
ठाकरे शिवसेना-भाजपमध्ये लढत

ठाकरे शिवसेना-भाजपमध्ये लढत

sakal_logo
By

ठाकरे शिवसेना-भाजपमध्ये लढत

मालवण तालुका; बांदीवडे खुर्द कोईलचे सरपंचपद रिक्त

प्रशांत हिंदळेकर ः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यात भाजप विरुद्ध ठाकरे गट शिवसेना यांच्यातच खरी लढत होत आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही काही उमेदवार पुरस्कृत केले आहेत, तर महाविकास आघाडीतून अन्य घटक पक्षांनीही पुरस्कृत उमेदवार उभे केले आहेत. चिन्हवाटपानंतर आता गावागावांत प्रचाराला वेग आला आहे.
तालुक्यात सरपंचपदी बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे ः असगणी- साक्षी चव्हाण, पळसंब- महेश वरक, शिरवंडे- चैताली गावकर, साळेल- रवींद्र साळकर, आंबडोस- सुबोधिनी परब, काळसे-विशाखा काळसेकर, घुमडे- स्नेहल बिरमोळे, कातवड- प्रतीक्षा हळदणकर, आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ- रश्मी टेंबुलकर. तालुक्यात सदस्य म्हणून बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे ः पळसंब-राधिका तर्फे, रसिका साटम, सत्यवान तेजम, स्मिता जुवेकर, संतोष परब, ऋतुजा सावंत, अविराज परब, शिरवंडे-सुजाता शिरवंडेकर, सुप्रिया बाणे, विजय खांडेकर, प्राची घाडीगावकर, रघुनाथ गावकर, सुरेश गावकर, अस्मिता गावकर, तनुजा गावकर, कैलास गावकर, बांदिवडे खुर्द कोईल- मनीषा पेडणेकर, अरविंद साटम, पांडुरंग भांडे, शामसुंदर साटम, साक्षी साटम, साळेल-अश्‍विनी जाधव, विवेकानंद पेडणेकर, शिल्पा गावडे, संपदा गावडे, समीर गावडे, सिद्धी पवार, लक्ष्मण परब, आंबडोस-सुलभा परब, श्रद्धा नाईक, रामदास नाईक, आदिती परब, सतीश दळवी, प्रवीण मराळ, खोटले-कमलेश परब, प्रणोती परब, रणजित परब, मानसी चव्हाण, सहदेव मोडक, काळसे-सुशील काळसेकर, भाग्यश्री काळसेकर, लक्ष्मण माडये, अनुष्का हेरेकर, खुशी राऊळ, चंद्रकांत राऊळ, अनिल सरमळकर, मोनिका म्हापणकर, सुजाता परब, घुमडे-योगिता जाधव, सुगंधा बिरमोळे, योगेंद्र सामंत, प्रीती बिरमोळे, राजेश सावंत, चंदा वस्त, सुबराव राणे, कातवड-मीना सुपल, काजल घाडी, प्रवीण परब, भाग्यश्री चव्हाण, गणेश चव्हाण, गजानन खोत, अक्षता नाईक.
सरपंचपदासाठी नशीब आजमावत असलेले गाववार उमेदवार असे ः श्रावण- श्‍वेता चव्हाण, नम्रता मुद्राळे, निरोम- संतोष घाडी, बाबाजी राऊत, रामगड- राजेंद्र घाडीगावकर, शंकर जाधव, शुभम मटकर, मठबुद्रुक- सागर कदम, मोहन वेंगुर्लेकर, अभय सरमळकर, बुधवळे-कुडोपी- श्रीराम पाटील, संतोष पानवलकर, राजेंद्र मुणगेकर, गोठणे- श्रेया चव्हाण, दिप्ती हाटले, किर्लोस- साक्षी चव्हाण, कविता मेस्त्री, राठिवडे- दिव्या धुरी, कविता पांचाळ, त्रिंबक- किशोर त्रिंबककर, श्रीकांत बागवे, हिवाळे- रघुनाथ धुरी, सचिन परब, नंदकुमार पवार, ओवळीये- रसिका ओवळीयेकर, रंजना पडवळ, असरोंडी- अनंत पोईपकर, विलास मेस्त्री, बांदिवडे बुद्रुक- उमेश परब, अनंत मयेकर, तोंडवळी- नेहा तोंडवळकर, सुजाता पाटील, केतकी मायबा, वायंगणी- रुपेश पाटकर, भिकाजी वायंगणकर, कोळंब- भुवनेश्‍वरी कामतेकर, सिया धुरी, कोमल लाटकर, हडी- राजेश शेडगे, प्रकाश तोंडवळकर, दिनेश सुर्वे, कांदळगाव- रणजित परब, आनंद आयकर, भूषण सुर्वे, महान- अक्षय तावडे, शशांक माने, रेवंडी- जयराम कांबळी, अमोल रेवंडकर, अमोल वस्त, मिर्याबांदा- पूजा कवटकर, नीलिमा परूळेकर, वेरळ- धनजंय परब, भगवान परब, माळगाव- दीपाली जाधव, शीतल परब, चैताली साळकर, मालोंड- पूर्वा फणसगावकर, अपूर्वा सारंग, पोईप- श्रीधर नाईक, शिवरामपंत पालव, वडाचापाट- सोनिया प्रभुदेसाई, सुगंधी बांदकर, चाफेखोल-नंदिता गोसावी, राजलता गोसावी, नांदरूख- रामचंद्र चव्हाण, विलास चव्हाण, सुकळवाड- युवराज गरूड, सरिता पाताडे, नांदोस- पूजा चव्हाण, माधुरी चव्हाण, सानिका चव्हाण, स्नेहल नांदोसकर, तिरवडे-रेश्मा गावडे, अमेया मुळीक, हेदूळ- प्रतीक्षा पांचाळ, दर्शना पुजारे, प्राची मोरये, तळगाव- लता खोत, प्रांजल सावंत, खोटले- लक्ष्मण कदम, अमित परब, सुशील परब, वायंगवडे- विशाखा सकपाळ, आदिती सावंत, वराड- माधुरी मसुरकर, शलाका रावले, वरची गुरामनगरी- शेखर पेणकर, सतीश वाईरकर, धामापूर- मानसी परब, जागृती भोळे, आंबेरी- मनमोहन डिचोलकर, यतीन डिचोलकर, देवली- अमित वाक्कर, शामसुंदर वाक्कर, चौके- गोपाळ चौकेकर, सुरेश चौकेकर, कुंभारमाठ- शीतल देऊलकर, पूनम वाटेगावकर, देवबाग- मोहन कुबल, मकरंद चोपडेकर, रामचंद्र चोपडेकर, उल्हास तांडेल, नादार तुळसकर, अमृत राऊळ, तारकर्ली-काळेथर- स्नेहा केरकर, मृणाली मयेकर, वायरी भुतनाथ- भालचंद्र केळुसकर, घनःश्याम झाड, मनोज झाड, वर्षा परब, शिवराम मांजरेकर, भगवान लुडबे.
--
चौकट
कोण बाजी मारणार?
तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ५५ पैकी ४५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी निवडणुका होत आहेत. बांदीवडे खुर्द कोईल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पडलेल्या आरक्षणाचा उमेदवारच नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ग्रामपंचायतीवर अधिकाधिक वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने आणि ठाकरे गट शिवसेनेनेही कंबर कसली आहे. त्यामुळे तालुक्यात कोण बाजी मारणार, हे येत्या २० तारखेलाच दिसून येणार आहे.