व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘पाट’चे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘पाट’चे वर्चस्व
व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘पाट’चे वर्चस्व

व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘पाट’चे वर्चस्व

sakal_logo
By

67972
पाट ः जिल्हास्तरीय शालेय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलने वर्चस्व राखले.

व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘पाट’चे वर्चस्व

जिल्हास्तरीय स्पर्धा; मुला-मुलींच्या संघांची विभागस्तरावर निवड

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः एस. एल. देसाई पाट विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोडामार्ग संघावर २-० ने मात करीत विजेतेपद पटकावले.
पाट विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने कर्णधार विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रज्योत मेस्त्री, यश चव्हाण, यश मांजरेकर, आर्यन खोबरेकर, सम्यक तेंडुलकर यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. मनस्वी मेतर हिच्या नेतृत्वाखाली १४ वर्षे मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. मुलांच्या १७ वर्षांखालील संघाने आंबोली सैनिकी स्कूलच्या संघाचा पराभव केला. कर्णधार शिवराम नांदोस्कर याच्या नेतृत्वाखाली आकाश गोसावी, गौरांग गोसावी, चंद्रशेखर तुळसकर, सुयोग केरकर, साई कानडे यांनी चांगला खेळ केला. मुलांच्या १९ वर्षांखालील संघाने कर्णधार चित्रांग साळगावकर याच्या नेतृत्वाखाली कणकवली कॉलेज संघावर २-० ने मात केली. समर्थ तेली, पियुष शिंत्रे, आशीर्वाद नागोळकर, मुकुल हंजनकर, राहुल कोचरेकर यांनी चांगला खेळ करून संघाच्या विजयात वाटा उचलला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या तीन संघांची निवड मालवण व सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक राजन हंजनकर, संजय पवार, कुबल यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, दीपक पाटकर आदींनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.