ध्येय ठरवा, योजना आखा आणि कृती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येय ठरवा, योजना आखा आणि कृती करा
ध्येय ठरवा, योजना आखा आणि कृती करा

ध्येय ठरवा, योजना आखा आणि कृती करा

sakal_logo
By

rat१२१९.txt

(टुडे पान ३ साठी)

ध्येय ठरवा, योजना आखा, कृती करा

डॉ. अपर्णा महाजन; स्वयंप्रेरणा संवादावर व्याख्यान

रत्नागिरी, ता. १२ : जीवनामध्ये संधी शोधण्याची क्षमता वाढवा. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्याला कोणते ध्येय साधायचे आहे हे निश्चितपणे ठरवा. पण त्या ध्येयापर्यंत प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रत्येक टप्प्यातून मिळणारा अनुभव साठवत जावा. त्यामुळे ध्येय ठरवा योजना आखा आणि त्यानुसार कृती करा, असे प्रतिपादन डॉ.अपर्णा महाजन यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सभागृहात आयोजित विद्यार्थी आणि स्वयंप्रेरणा - एक संवाद या कार्यशाळेत बोलत होत्या. महाविद्यालयातील जीवन कौशल्य विकसन समितीच्या वतीने याचे आयोजन केले. विद्यार्थी, डॉ. अपर्णा महाजन म्हणाल्या की ध्येय ठरवण्याआधी आपली क्षमता आणि आपल्यातील उणिवा जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आपलं ध्येय हे नेमकं, मोजून ठरवलेलं, साध्य करण्यायोग्य आणि आपल्या आवडीची, आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीशी संबंधित आणि वेळेचे बंधन असलेलं अशा स्वरूपाचे असावे. ज्यामुळे ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात कधीही ताण उद्भवत नाही.
अध्यक्षीय मनोगतात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी सतत कार्य मग्न असणे गरजेचे आहे. जीवन कौशल्य विकसन समितीचे समन्वयक प्रा. वासुदेव आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. मनस्वी नाटेकर हिने सूत्रसंचालन केले. सेजल तांबे हिने आभार मानले.