कौटुंबिक ह्रदयस्पर्शी नाटक रात्र संपली पण उजाडल कुठं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक ह्रदयस्पर्शी नाटक रात्र संपली पण उजाडल कुठं
कौटुंबिक ह्रदयस्पर्शी नाटक रात्र संपली पण उजाडल कुठं

कौटुंबिक ह्रदयस्पर्शी नाटक रात्र संपली पण उजाडल कुठं

sakal_logo
By

rat१२१३. txt

(टुडे पान ३ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-ra१३p३.jpg-
६७९९१
ः राज्य नाट्य स्पर्धेत आश्रय सेवा संस्था रत्नागिरीच्या रात्र संपली पण उजाडलं कुठं या नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
राज्य नाट्य स्पर्धा--लोगो

कौटुंबिक ह्रदयस्पर्शी नाटक रात्र संपली पण उजाडल कुठं

महिलांचे पुरुषविरहित नाटक रंगतदार ः आश्रय सेवा संस्थेचे सादरीकरण

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः राज्य नाट्य स्पर्धेत आतापर्यंत दहा नाटकांचे सादरीकरण झाले. मात्र पुरुषविरहित केवळ महिलांच्या नाटकाचा प्रथम प्रयोग आश्रय सेवा संस्था रत्नागिरीने केला. लिला फणसळकर लिखित कौटुंबिक ह्रदयस्पर्शी रात्र संपली पण उजाडल कुठं नाटक सादर करून वेगळेपण निर्माण केले. स्पर्धेत अशा नाटकाचा प्रथम प्रयोग रत्नागिरीकरांना पाहायला मिळाला. या नाटकाचे मनोहर जोशी यांनी दिग्दर्शन केले. कौटुंबिक, ह्रदयस्पर्शी या नाटकात अभिनय थोडासा तोकडा पडला मात्र नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा अशा बाजूंनी संस्था नाटकातील कौटुंबिक गुंतागुंत सोडविण्यास यशस्वी झाली.

काय आहे नाटक ?
हे नाटक १९७० च्या दशकातील असून पुरुषविरहित आहे. कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करत प्रेक्षकांच्या हदयाला हळुवारपणे मायेचा स्पर्श करुन जाणारे हे नाटक आहे. एका वैभव संपन्न मध्यमवर्गीय कुटुंबातील एका गृहिणीची आणि पुत्र प्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा रात्र संपली पण उजाडल कुठं या नाटकातून मांडण्यात आली आहे. शिखरे कुटुंबातील घरात काम करणारी नर्मदा आणि कालिंदी शिखरे यांच्या संवादाने रंगमंच उजळतो. नर्मदा तिची आधीची मालकीणीची आठवण काढतात. तर कालिंदी पती व मुलाच्या परदेशातून येण्यावरुन बोलत असतात. कालिंदीची होणारी सून येते तिच्याशी गप्पा होतात. मानसोपच्चार तज्ज्ञ महिला डॉक्टरचा कालिंदीला फोन येतो. मुळ मालकीण मंदाकिनी पुर्ण बरी होऊन घरी येत असल्याचे सांगते. कालिंदी ही मंदाकिनीची बहिण असते बारा वर्षाच्या कालवधीत कालिंदी मंदाकिनीच्या मुलाचा रत्नाकरचा संभाळ करण्यासाठी मामाच्या सांगण्यावरुन ती बहिणीच्या नवऱ्याबरोबर लग्न करते. मानसिक रुग्ण झालेली तिची बहिण मंदाकिनीघरी येते त्यावेळी ती डॉक्टरच्या सांगण्यावरुन आपण पुर्वी प्रमाणे असल्याचे भासवते. मात्र घरातील सुविधा या बघून मंदाकिनीला शंका येत असते. पण ज्यावेळी मंदाकिनीच्या नवऱ्याचा परदेशातून फोन येतो तिचे बोलणे ती ऐकते. त्यावेळी तीची होणारी सून, स्वतः कालींदी समजावते पण मानसिक रुग्ण असलेली मंदाकिनी माझ आता काय आहे. असे म्हणून कोलमडते. अशी कथा रात्र संपली पण उजाडलं कुठं या नाटकात आहे. दोन व्यक्ती जन्मभरासाठी एका सूत्राने बांधल्या जातात. तेव्हा त्यांची सुखदुःखे एकमेकांशी निगडीत असतात अशाच एका गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल या नाटकातून करण्यात आली आहे. महिला नाट्यातून उत्तम सादरीकरण रसिकांना पहायला मिळाले.


सूत्रधार आणि साहाय
प्रकाश योजना ः शेखर मुळ्ये, रंगभूषा ः रामदास मोरे, केतकी जोशी, वेशभूषा ः संगिता जोशी. वेशभूषा सहाय्यक ः अनुराधा जोशी. नेपथ्य ः रामदास मोरे आणि सहकारी. रंगमंच व्यवस्था ः अरुण मुळ्ये, प्रकाश जोशी, चेतन जोशी. ध्वनी संयोजन ः अरुण जोशी, पार्श्वसंगीत ः कौस्तुभ उर्फ निखिल जोशी, विशेष सहाय्य ः श्वेता जोगळेकर, श्री आदित्येश्वर प्रासादिक नाट्यमंडळ वरवडे आणि खल्वायन रत्नागिरी.

* पात्र परिचय
नर्मदा ः निता जोशी, कालिंदी ः जान्हवी जोशी, सरिता ः धनश्री जोशी, शरयू ः अपूर्वा जोशी, यमुनाबाई ः प्राजक्ता जोशी, मंदाकिनी ः शुभा जोशी.