नदीचे करू संरक्षण, राजापूरचे होईल संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीचे करू संरक्षण, राजापूरचे होईल संरक्षण
नदीचे करू संरक्षण, राजापूरचे होईल संरक्षण

नदीचे करू संरक्षण, राजापूरचे होईल संरक्षण

sakal_logo
By

rat१२p२१.jpg
६८०३१
राजापूरः नगर पालिकेच्यावतीने रॅलीचे स्वागत करताना मुख्याधिकारी प्रशांत भोसले. शेजारी सागर खडपे, जितेंद्र जाधव, पत्रकार महेश शिवलकर.
rat१२p२२.jpg
६८०३२
राजापूरः रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी.
-------------
चला, करुया नदीचे संवर्धन
गाळमुक्ती अभियान ; विद्यार्थ्यांचे रॅलीतून लोकसहभागाचे आवाहन
राजापूर, ता. १२ः नदीचे करू संवर्धन राजापूरचे होईल संरक्षण, नदीचा श्‍वास मोकळा करू या पर्यावरणाचे संवर्धन करू या, माझे गाव माझे घर, चला करू गाळमुक्त शहर, गाळ मुक्तीचा पवित्र कार्याला हातभार लावू या, आपल्या नद्या समृद्ध करू या, अशा जोरदार घोषणा देत काढलेल्या रॅलीद्वारे शहरातील विश्‍वनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाळमुक्ती अभियानामध्ये सहभागी होण्याचे सार्‍यांना आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केलेले ढोलवादन आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विविध संदेश देणारे फलकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
गाळमुक्ती अभियानामध्ये लोकसहभागा वाढावा म्हणून काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी जवाहर चौकामध्ये स्वागत केले. या वेळी मुख्य लिपीक जितेंद्र जाधव, पत्रकार महेश शिवलकर, सागर खडपे आदी उपस्थित होते.
नाम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि नगर पालिका, महसूल विभाग यांच्या सहकार्याने लोकसहभागातून शहरातून वाहणार्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांमधील गाळाचा उपसा करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमामध्ये लोकसहभाग वाढावा या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरातील विश्‍वनाथ विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यासह शहर परिसरामध्ये ही रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाजविलेल्या ढोल-ताशांच्या गजरात रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या विविध घोषणा दिल्या.