चिपळूण-मालदोली खाडीकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-मालदोली खाडीकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करा
चिपळूण-मालदोली खाडीकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

चिपळूण-मालदोली खाडीकिनाऱ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करा

sakal_logo
By

rat12p24.jpg-
68033
चिपळूण : दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा मेरिटाईम बोर्डामार्फत विकसित करण्याची मागणी खासदार तटकरे यांच्याकडे करण्यात आली.
---------------
मालदोली खाडी किनाऱ्याचा विकास करा
मेरिटाईम बोर्डाला निवेदन; विपुल निसर्गसंपदा असूनही वंचित
चिपळूण, ता. १२ : दोणवली, गांग्रई व मालदोली परिसराला मोठ्या प्रमाणावर वाशिष्ठीचा खाडी किनारा लाभलेला आहे. विपुल प्रमाणावर नैसर्गिक संपदा लाभलेला हा खाडी किनारा विकासापासून गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आहे. दोणवली, गांग्रई व मालदोली असा जवळपास पाच किमीचा खाडी किनारा विकसित केल्यास येथील पारंपरिक मासेमारी व्यवसायाला व पर्यटनाला चालनादेखील प्राप्त होईल. हा खाडी किनारा मेरिटाईम बोर्डामार्फत विकसित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली.
मालदोली जेट्टी येथे क्रोकोडाईल सफर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा विकसित केल्यास चांगले पर्यटन केंद्र होऊ शकेल. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासाठी दोणवली, गांग्रई व मालदोली खाडी किनारा विकास करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण, गावातील जयंत चव्हाण, अस्मित चव्हाण, अमोल चव्हाण, मंगेश चव्हाण या तरुणांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
--------
चौकट
मासेमारी प्रमुख व्यवसाय
दोणवली सुतवी बंदरातून तसेच गांग्रई व मालदोली जेट्टी येथून मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मासेमारी व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. येथील नागरिकांचे रोजगाराचे महत्त्वाचे माध्यम म्हणून हा मासेमारी व्यवसाय या बंदरातून होत आहे.