बाळासाहेबांची शिवसेना खाते खोलणार का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांची शिवसेना खाते खोलणार का
बाळासाहेबांची शिवसेना खाते खोलणार का

बाळासाहेबांची शिवसेना खाते खोलणार का

sakal_logo
By

rat१२६.txt

(पान २ साठी)

रणधुमाळी---लोगो

बाळासाहेबांची शिवसेना खाते खोलणार का?

राजापूर तालुका ; ठाकरे सेनेसमोर वर्चस्व टिकविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखित करणाऱ्‍या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागावर असलेले वर्चस्व टिकविताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भाजपासह पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी अन् नव्याने गठीत झालेल्या शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी पुढील आठवड्यात मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमावण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. तालुक्याच्या राजकारणाचा विचार करताना तालुक्याच्या ग्रामीण भागावर पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व राहीले आहे. ग्रामपंचायतींसह पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद शिवसेनेचे वर्चस्व राहीले आहे. हे वर्चस्व या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये टिकवून ठेवताना त्यामध्ये वाढ करण्याचे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर ठाकले आहे. हे करीत असताना सेनेला भाजप आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेसचा-राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
ग्रामीण भागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीही आपली ताकद, अस्तित्व टिकवून आहे. भाजपाने गेल्या काही वर्षामध्ये विकासकामाच्या मुद्दावर आक्रमक भूमिका घेत आपली ताकद वाढविण्याला सुरवात केली आहे. अशा स्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये वर्चस्व असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अन्य राजकीय पक्षांच्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र या कठीण काळामध्ये संघटनात्मक असलेले बळ शिवसेनेला तारून नेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिंदे गटही तालुक्यामध्ये बस्तान बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून शिवसेनेसह अन्य पक्षातील अनेकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ तालुक्यामध्ये खाते खोलणार का? याचीही साऱ्‍यांना उत्सुकता आहे.