पेजे महाविद्यालयाचे मर्वीत श्रमसंस्कार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेजे महाविद्यालयाचे मर्वीत श्रमसंस्कार शिबिर
पेजे महाविद्यालयाचे मर्वीत श्रमसंस्कार शिबिर

पेजे महाविद्यालयाचे मर्वीत श्रमसंस्कार शिबिर

sakal_logo
By

rat१२३२.txt

(पान ५ साठी)

मेर्वीत पेजे महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

पावस, ता. १२ ः शिवारआंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर मेर्वी येथे झाले. शिबिराचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते, मेर्वी सरपंच शशिकांत महादये यांच्या उपस्थितीत झाले.
शिबिराच्या कालावधीत जांभूळवाडी येथे बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्यात आला. त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रवी खानविलकर व त्यांचे सहकारी यांनी प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले. डॉ. के. आर.चव्हाण यांनी युवक व सामाजिक बांधिलकी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांचे सायबर गुन्हे या विषयावर व्याख्यान दिले. भाजीपाला प्रशिक्षण शिबिर व आंबा काजू पीक रोगराई व उपाय या विषयावर कृषी अधिकारी बंडबे, सायली कांबळे यांनी मार्गदर्शन केले. गावातील उमेदीचे तळ्याची साफसफाई व पिकअप शेड साफसफाई करण्यात आली. लायन्स क्लबतर्फे डॉ. किशोर सूर्यवंशी व त्यांच्या टीमने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी व कमी दरात चष्मे वाटप शिबिर घेतले. मेर्वी शाळेची साफसफाई करण्यात आली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य राकेश आंबेकर, सरपंच शशिकांत महादये, संतोष कडवईकर यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ झाला. सर्व शिबिरात अंताक्षरी स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, अभिनय स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. शिबिरात उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून जय नारकर व उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून मीनल डावल, उत्स्फूर्त स्वयंसेवक अनुराग नाटेकर, उत्कृष्ट गटप्रमुख शशिकांत गुरव, उत्कृष्ट गटप्रमुखा रूपा लिंगायत यांना गौरविण्यात आले.