खेळाडूंना किट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडूंना किट वाटप
खेळाडूंना किट वाटप

खेळाडूंना किट वाटप

sakal_logo
By

rat१२४०.txt

(पान ५ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat१२p३०.jpg-
६८०७८
खेड ः जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसमवेत प्राचार्य डॉ.अली व मार्गदर्शक शिक्षक
-
बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

खेड ः लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील आठवीतील संध्या मेहता व सातवीतील गुनगुन सचाण यांनी बाजी मारली. या दोघांची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते दोघींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खजिनदार दिग्विजय इंदूलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शैक्षणिक समन्वयक डॉ. अजित भोसले, पर्यवेक्षक ए. एच. घोसाळकर आदी उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat१२p३१.jpg-
६८०७९
खेड ः तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या संघासमवेत प्राचार्य भरत मोरे.

ज्ञानदीप स्कूल संघाची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

खेड ः रत्नागिरी येथील क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश स्कूलने विजेतेपद पटकावले. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मालिकावीर म्हणून संदीप शिर्के याची निवड झाली आहे. उपांत्य सामन्यात मनीष आंब्रेने चमकदार कामगिरी करत ६ चेंडूत एकही धाव न देता ३ गडी बाद केले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली. हर्ष कदम यानेही अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आर्यन रिगे, मनीष आंब्रे, यश मोरे, वेदांग भावे, वेंदात गुणदेकर, श्रवण शिर्के, संस्कार पवार, सार्थक गुणदेकर, साहिल चाळके, सिद्धेश गोंजारे, सूरज मोरे, स्वस्तिक माने, हर्ष मोरे, हर्ष कदम यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
---

कबड्डी निवड चाचणी खेळाडूंना कीट

खेड ः जिल्हा अजिंक्यपद किशोर -किशोरी कबड्डी निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना तालुका कबड्डी असोसिएनशच्या वतीने कीटचे वाटप करण्यात आले. ठेकेदार मल्लू राठोड व तालुका कबड्डी पंच मंडळाच्या सहकार्यांने हे कीट प्राप्त झाले आहे. भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या मैदानात कीट वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी तालुका कबड्डी असोसिएनशचे अध्यक्ष सतीश चिकणे, सचिव रवींद्र बैकर, कोषाध्यक्ष दाजी राजगुरू, सहसचिव शरद भोसले, मुख्याध्यापक महेश बोधे, क्रीडाशिक्षक सुजित फागे, राज्य पंच उल्हास शेलार, परेश खोपडे, श्याम बैकर आदी उपस्थित होते.
---

शिरवली हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

खेड ः तालुक्यातील शिरवली येथील देवी पद्यावती हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांनी ३२ प्रतिकृतींची मांडणी केली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था सचिव दत्तात्रय धुमक यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच परशुराम कुळे, तंटामुक्त अध्यक्ष वसंत गुरव, मुख्याध्यापक टेमकर, विज्ञान शिक्षिका शेले, भोसले आदी उपस्थित होते. प्रदर्शनात आठवीतील सुजल कदम, मनीष कदमने प्रथम, दहावीतील स्वरा कदमने द्वितीय, तर नववीतील जान्हवी मोरेच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
---

वेरळला शुक्रवार पासून क्रिकेट स्पर्धा

खेड ः तालुक्यातील वेरळ येथील समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठानच्या वतीने १६ व १७ डिसेंबरला रोजी श्री समर्थ कृपा इंग्लिश स्कूलच्या मैदानात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही गौरविण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी दिग्विजय इंदुलकर, संदीप जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
---

फोटो ओळी
-rat१२p३२.jpg-
६८०८०
खेड ः चिंचघरचे राकेश शिंदे यांचा सन्मान करताना चाकाळे गावचे शंकर पार्टे.

चिंचघरच्या शिंदेनी सोनसाखळी केली परत

खेड ः तालुक्यातील चिंचघर -वेताळवाडी येथील राकेश शिंदे यांना सापडलेली दीड तोळे वजनाची सोनसाखळी संबंधित मालकास परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिरात सुहासिनी उत्सव कार्यक्रमादरम्यान नरेंद्र बर्गे यांची सोनसाखली हरवली होती. शिंदे यांना ही सोनसाखळी सापडल्यानंतर त्यांनी मंदिरात जावून सुपूर्द केली. याबद्दल शंकर पार्टे यांच्याहस्ते शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.