दाभोळ-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या दापोलीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या दापोलीत
दाभोळ-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या दापोलीत

दाभोळ-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या दापोलीत

sakal_logo
By

rat१२p३५.jpg
६८०९५
दापोली : पत्रकार परिषदेत माहिती देताना कुलगुरू डॉ. संजय सावंत.
----------
कृषी संशोधन समितीची दापोलीत बैठक
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती; कुलगुरु सावंत यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १२ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे १४ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बैठकीत महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठातील सर्व कुलगुरू, संचालक, विभाग प्रमुख, सर्व पिक समन्वयक आणि कृषी व संलग्न विभागातील सचिव, आयुक्त आणि अधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सर्व संचालक असे एकूण मिळून सुमारे ३०० ते ३५० शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचे उद्घघाटन १४ डिसेंबरला सकाळी १० मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारच्या सत्रात कृषी व संलग्न विभाग, हवामान विभाग, संशोधन संचालक सर्व कृषी विद्यापीठे आणि संचालक, सर्व कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत असलेल्या संस्थाचे मागील वर्षातील महत्वाच्या संशोधनाच्या विकासकामाचे सादरीकरण होणार आहे.
दुसऱ्या दिवशी एकूण १२ अभ्यासगट यांचे वेगवेगळ्या सत्रात शेती निगडीत विषयावर विविध तंत्रज्ञान याबद्दल चर्चासत्र होणार आहे. यामध्ये
प्रत्येक अभ्यासगट सादरीकरण करणार आहे. या परिषदेचा समारोप १६ डिसेंबरला सकाळी १० वाजता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्याला चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण संचालक डॉ. नरंगळकर उपस्थित होते.