
नाणीजला रविवारचा आठवडा बाजार सुरू
rat१२४८.TXT
(पान ५ साठी)
फोटो ओळी
- rat१२p३३.jpg-
६८०९०
नाणीज ः आठवडा बाजाराच्या उदघाटनानंतर बाजाराची पाहणी करताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व अन्य.
नाणीजला रविवारचा आठवडा बाजार सुरू
ग्रामस्थांची गैरसोय दूर ; मंत्री सामंतांच्या हस्ते आरंभ
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १२ ः तालुक्यातील नाणीज येथे नव्याने सुरू झालेल्या आठवडा बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते झाले. दर रविवारी नाणीज येथील ग्रामपंचायतीजवळ आठवडा बाजार भरणार आहे.
नाणीज येथे आठवडा बाजार भरत नसल्याने ग्रामस्थांची, विशेषतः महिलांची गैरसोय होत होती. या बाजारामुळे ती दूर झाली आहे. बाजारामुळे नाणिजच्या व्यापाराला चालना मिळेल. वेगवेगळे भाजी विक्रेते किंवा इतर व्यापारी, मासे विक्रेते नाणीज मध्ये येतील. यापूर्वी बाजारासाठी फक्त करंजारी आणि पालीवरच अवलंबून राहावे लागत होते. आता नाणीज व परिसरातील लोकांना जवळच हक्काचा बाजार उपलब्ध झाला आहे. येथे स्वस्त दराने भाजी आणि इतर वस्तू उपलब्ध होतील. लोकांचा प्रवास खर्च व वेळ वाचेल. यावेळी मंत्र्यांचे छोटेसे भाषण झाले. नाणीजच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाजाराचे उद्घाटन झाल्यानंतर मंत्री सामंत यांनी बाजारात फेरफटका मारून व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाणीजचे सरपंच गौरव संसारे, सदस्य विनायक शिवगण यांनी बाजार सुरू करण्याच्या निर्णयाविषयी माहिती दिली. माजी सरपंच दत्ताराम शिवगण, उपसरपंच राधिका शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.