सावंतवाडीत ‘मॅरेथॉन’मध्ये ५९७ जण धावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत ‘मॅरेथॉन’मध्ये ५९७ जण धावले
सावंतवाडीत ‘मॅरेथॉन’मध्ये ५९७ जण धावले

सावंतवाडीत ‘मॅरेथॉन’मध्ये ५९७ जण धावले

sakal_logo
By

68099
आंबोली : मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सुभेदार मेजर आर. एन. भांजा व बी. एच. एम. सुरजितसिंग, सुनिल राऊळ आदी.

सावंतवाडीत ‘मॅरेथॉन’मध्ये ५९७ जण धावले

सैनिक स्कूलचे आयोजन; सिंधुदुर्गसह कोल्हापूर, रत्नागिरीतील स्पर्धकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज प्रशालेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वयोगटातील ५९७ धावपटूंनी सहभाग नोंदवला. येथील प्रसिद्ध जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून स्पर्धेला सुरुवात झाली.
यावेळी बिग्रेडीयर सुधीर सावंत, ५८ महाराष्ट्र एमसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल यांचे प्रतिनिधी ॲडम ऑफिसर सुभेदार मेजर आर. एन. भांजा व बी. एच. एम. सुरजितसिंग, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सैनिक स्कूलचे सेक्रेटरी सुनील राऊळ, सैनिक स्कूलचे संचालक जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एस. टी. गावडे, सिंधुदुर्ग आयइएसएलचे अध्यक्ष शशिकांत गावडे, कॅप्टन सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष दीपक शेट्ये, सैनिक पतसंस्था चेअरमन शिवराम जोशी, संचालक चंद्रकांत शिरसाट, बाबुराव कविटकर, सैनिक पतसंस्थेचे उपमहावस्थापक प्रल्हाद तावडे, क्रीडाशिक्षक शैलेश नाईक आदी उपस्थित होते.
शहिदांना समर्पित असलेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रगीत गायन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. सैनिक स्कूल कॅडेट सन्मेश पाटील याने शहीद जवानांच्या बलिदानावर कविता सादर करून मानवंदना दिली. प्रास्ताविकात सुनील राऊळ यांनी मॅरेथॉन स्पर्धा सैनिक स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त शहीद जवानांच्या अत्युच्च बलिदानास समर्पित करण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. ब्रिगेडीयर सावंत यांनी सैन्य सेवेत मनोबल महत्त्वाचे असल्याचे सांगितले. क्रीडाशिक्षक नाईक व मनोज देसाई यांनी स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. मॅरेथॉन स्पर्धा खुलागट, १७ वर्षांखालील व १४ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण पाच गटांत घेण्यात आली. यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत एकूण ५९७ धावपटू सहभागी झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान, विजेत्या स्पर्धकांना ब्रिगेडीयर सावंत, सुभेदार मेजर भांजा, सुरजितसिंग, सैनिक स्कूलचे सेक्रेटरी राऊळ व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र मिळाले नसल्यास संस्थेच्या कार्यालयातून घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले.
--
स्पर्धेचा निकाल असा
१४ वर्षांखालील मुली-पूजा सावंत, आर्या कापाडी, अक्षता लिंगवत. १४ वर्षांखालील मुले-पार्थ डकारे, सुजय पेटेकुळकर, श्वेत धरणे. १७ वर्षांखालील मुले-स्वराज जोशी, हर्षल कदम, श्रेयस ओकटे. खुला गट पुरुष-विवेक मोरे, प्रमोद गावडे, फ्रेंकी गोम्स. खुला गट महिला-प्रथम रोहिणी पाटील, द्वितीय सोनल येंडे व भक्ती पोटे, तृतीय सतिषा वेर्णेकर व रसिका परब.