खड्ड्यात पडून जखमी झालेल्या एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यात पडून जखमी 
झालेल्या एकाचा मृत्यू
खड्ड्यात पडून जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

खड्ड्यात पडून जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

sakal_logo
By

68105
रवींद्रनाथ मुसळे

खड्ड्यात पडून जखमी
झालेल्या एकाचा मृत्यू

कणकवली रेल्वेस्थानक जवळील घटना

कणकवली,ता. १२ ः सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ नागारिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ वसंत मुसळे (वय ६९) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुसळे हे रेल्वेस्थानकालगत जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाले होते. त्यांना शहरातील खासगी रुणालयात दाखल केले असता आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. मुसळे हे कणकवली रोटरी क्लब पदाधिकारी, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक, गोपुरी आश्रमचे पदाधिकारी होते. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंस म्हणून पुढील वर्षासाठी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे शोककळा पसरली आहे.