रत्नागिरी- क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- क्राईम
रत्नागिरी- क्राईम

रत्नागिरी- क्राईम

sakal_logo
By

पान ३ साठी, क्राईम


एमआयडीसीत लोखंडी साहित्याची चोरी
रत्नागिरी ः एमआयडीसी येथील वेल्डींग वर्क्स च्या मागील बाजूस ठेवलेले ४ हजार २०० रुपयांचे साहित्य पळविणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजिद कासम नाईक (वय ३१, रा. उद्यमनगर, राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास रत्नसागर मरीन वर्कस नावाचे वेल्डींग वर्कशॉप ऑक्टेल कंपनीसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती बिरु मानवर (वय ४८, ऑक्टेल कंपनी समोर, एमआयडीसी, रत्नागिरी) यांच्या रत्नसागर वर्कशॉपच्या आवारात अनधिकृत प्रवेश करून वर्कशॉपच्या आवारात पाठीमागील बाजूस ठेवलेले ७०० रुपयांचे पाईप, ७०० रुपयांचे चॅनेल, १ हजार ५०० रुपयांचा चॅनेल, एक हजाराचे लोखंडी बोटीचे इंजिन, ३०० रुपयांचे तुकडे असा सुमारे ४ हजार २०० रुपयांचे साहित्य संशयिताने पळविले. या प्रकरणी मारुती मानवर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

दुचाकीची म्हशीला ठोकर, स्वार जखमी
रत्नागिरी ः तालुक्यातील करबुडे -वेतोशी फाटा रस्त्यावर म्हशीला ठोकर देऊन अपघात करुन स्वतःच्या दुखापतीस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अंकुश अनंत घाणेकर (वय ३३, रा. देऊड, पिंपळवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वेतोशी फाटा येथील रस्त्यावर घडली. संशयित हे दुचाकी (एमएच ०८ एएस १६०६) घेऊन जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्याने जाणाऱ्या म्हशीला ठोकर दिली. यामध्ये स्वतःच्या दुखापतीस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल विनायक राजवैद्य यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

परटवणेतील जुगार अड्ड्यावर छापा
रत्नागिरी ः शहरातील परटवणे-साईमंदिर येथे पोलिसांनी मटका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उदय शांताराम गोवेकर (वय ५६, रा. परटवणे, साईमंदिर समोर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १२) दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गोवेकर हे विनापरवाना मटका जुगार खेळ चालवत असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली या कारवाई साहित्यासह १ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वीर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस अमंलदार करत आहेत.

केळशीतील प्रौढाची आत्महत्या
दाभोळ : दापोली तालुक्यातील केळशी येथील प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र शांताराम उके (वय ५५, रा. केळशी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.११) सायंकाळी साडेचारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत राजेंद्र हा घराच्या जवळ असलेल्या विहिरीजवळील फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांना ग्रामस्थांनी खाली उतरून उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल कमलाकर चौरे करत आहेत.