गावातच चर्चा करून समस्या मार्गी लावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावातच चर्चा करून समस्या मार्गी लावणार
गावातच चर्चा करून समस्या मार्गी लावणार

गावातच चर्चा करून समस्या मार्गी लावणार

sakal_logo
By

rat१२४४.txt

(पान ५ साठी)

गावातच समस्या मार्गी लावणार

बीडीओ उमा घार्गे ; तोंडली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १२ ः आम्ही तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी आहोत. लोकांनी येथे येण्यापेक्षा आम्हीच जनतेच्या दारी येऊ. गावचे जे काही प्रश्न आहेत, त्यावर गावातच चर्चेतून समस्या मार्गी लावण्याला प्राधान्य देऊ, असे आश्वासन येथील गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या तोंडली ग्रामस्थांच्या शिष्ठमंडळास दिले.
तोंडली येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थ पंचायत समितीत आले होते. तोंडली ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. जलजीवन मिशन आणि अन्य कामाच्या आदेशाची मुदत संपली तरीही कामे झाली नाहीत. पंचायत समितीतून कामाचे आदेश मिळूनही काम ग्रामपंचायत करीत नाही. जलजीवन मिशनच्या प्रस्ताव आणि अंदाज पत्रकाचे काय झाले? असा सवाल सावंत यांनी केला. त्यावर उपअभियंता अविनाश जाधव म्हणाले, आपण पाच वेळा गावात जाऊन आलो. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या सूचनेनुसार अंदाजपत्रक तयार केले. या संदर्भात प्रस्तावही आला आहे. हे काम तत्काळ होणे गरजेचे आहे. आज पाण्याची समस्या आहे. सर्व वाड्यांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे. यासाठी आम्ही ग्रामसभा आम्ही घेत आहोत. ग्रामस्थांच्या व्यथा ही जाणून घ्या, अशी मागणी सावंत यांनी केली.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोमवारी (ता. १९) ग्रामपंचायतीत येत आहोत. आम्ही जनतेसाठी आहोत. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पंचायत समितीत येण्यापेक्षा आम्हीच तिकडे आलो असतो, असे गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यावर संदीप सावंत यांनी गटविकास अधिकारी व अधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी माजी सभापती शरद शिगवण, माजी उपसरपंच सतीश सावंत, प्रभाकर सावंत, दिलीप कांबळे, विलास सावंत, गुणाजी कलंबते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.