लांजा-जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणी
लांजा-जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणी

लांजा-जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणी

sakal_logo
By

पान १ साठी)
फ्लायर

६८१२५
६८१२६
६८१२९

जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणी
शैव, वैष्णव प्रतिमा; महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम शक्य
लांजा, ता. १२ ः तालुक्यातील कातळगाव-जावडेत चौथ्या, पाचव्या शतकातील लेणीसमूहाचे संशोधन सुरू झाले असून त्यामध्ये शैव व वैष्णव प्रतिमा आढळल्या आहेत. हे शिल्पवैभव कोकणच्याच नव्हेतर दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील इतिहासाला नवा आयाम देणारे ठरणार आहे. सर्व शिल्पांकनाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जांभ्या लालसर दगडात याची निर्मिती झाली आहे. मात्र गेली हजारो वर्षे ऊन-पावसाचा तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात झिजली आहेत.
प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या वतीने कातळगांव-जावडे लेणीसमूहाला डॉ. वैशाली वेलणकर यांच्या अभ्यासगटाने भेट दिली. कातळगाव-जावडे येथील या लेणीसमूहाचे संशोधन प्रसिद्ध झाले असून ही लेणी चौथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच हिंदू धर्मातील कोकण किनारपट्टीवरील सर्वांत प्राचीन लेणी समूह म्हणून ही लेणी संशोधनातून समोर आली आहेत. या लेणीसमूहाचा अधिकाधिक अभ्यास व्हावा या दृष्टीने आयोजित केलेल्या अभ्यास गटात प्रा. गोपाळ जोगे, संशोधक सहाय्यक अमित पेंदाम, संशोधक विद्यार्थी चेतना गोसावी, पुरातत्त्वशास्त्र विद्यार्थी तार्किक खातू, प्रा. डॉ. अंजय धनावडे आदींचा समावेश होता. लांजा येथे या अभ्यासगटाचे लव्हेबल लांजा या संस्थेचे विजय हटकर व शिवगंध प्रतिष्ठानचे राजूदादा जाधव यांनी स्वागत केले. चौथ्या-पाचव्या शतकातील भारतीय मूर्ती कला यांमध्ये मोलाची आणि मूलभूत भर घालणाऱ्या शिल्पांचा आणि शिल्पपटाचा या ठिकाणी समावेश असल्याने या ठिकाणी आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे मत प्रा. गोपाळ जोगे यांनी व्यक्त केले.
कातळगाव जावडे अभ्यास दौऱ्यात स्थानिक संस्थांनी सहभाग घेऊन कातळगाव- जावडे येथील शिल्पसमृद्ध प्रतिमांचे महत्त्व तज्ज्ञांकडून समजून घेतले. या वेळी अनुष्का जाधव, अंकिता जाधव, सुमित गुरव, निशांत आचरेकर, गुरुप्रसाद धाडवे, महेंद्र चव्हाण, आकाश आसोगेकर आदी इतिहासप्रेमी सहभागी झाले होते.


दृष्टिक्षेपात
कोकण किनारी सर्वांत प्राचीन लेणी
जांभ्या लालसर दगडातून निर्मिती
महत्त्वाचे अंकन केलेले कथानक
डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाची मोहीम

महत्त्वाचे अंकन केलेले कथानक
या परिसरात झालेल्या अलीकडील संशोधनाने इतिहासाच्या आकलनाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कातळगांव-जावडे लेणीसमूहात आढळणारी विष्णूची भव्य मूर्ती, शेषशायी विष्णू व शैव संप्रदायातील महत्त्वाचे अंकन केलेले कथानक या सर्व शिल्पांकनाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून जांभ्या लालसर दगडात याची निर्मिती झाली आहे. येत्या काळात हे शिल्पवैभव महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम देणारे ठरण्याची शक्यता आहे.

कोट
दख्खन व महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळातील सर्व वैष्णव प्रतिमाशास्त्राची नव्याने मांडणी करण्याची क्षमता असलेले हे दुर्लक्षित शिल्पवैभव ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून सरकार व लोकसहभागातून जपायला हवे.
- डॉ. वैशाली वेलणकर, ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासिका, डेक्कन कॉलेज, पुणे