भरदिवसा फ्लॅट फोडणाऱ्यास पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरदिवसा फ्लॅट फोडणाऱ्यास पकडले
भरदिवसा फ्लॅट फोडणाऱ्यास पकडले

भरदिवसा फ्लॅट फोडणाऱ्यास पकडले

sakal_logo
By

68123
बांदा ः येथे सदनिकेच्या बाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

भरदिवसा फ्लॅट फोडणाऱ्यास पकडले

बांद्यातील प्रकार; तक्रार नसल्याने केवळ समज

बांदा, ता. १२ ः शहरात भर दिवसा चोरीच्या उद्देशाने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या परप्रांतीय चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याच इमारतीत राहणाऱ्या त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, येथील पोलिसात तक्रार दाखल नसल्याने पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.
सविस्तर माहिती अशी की, शहरात नवीन महामार्गनजीक असलेल्या इमारतीत हे परप्रांतीय कामगार एका सदनिकेत एकत्र राहतात. त्याच्या शेजारी अन्य एक सदनिका आहे. या सदनिकेचा मालक आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास फ्लॅट बंद करून चावी नजिकच ठेऊन बाजारात निघून गेला होता. ही संधी साधत लगतच्या सदनिकेत असलेल्या परप्रांतीय कामगारांने चावी चोरून फ्लॅट उघडला. त्याने आतमध्ये प्रवेश केला. मालक आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आढळला. त्यांनी खात्री केली असता चोरटा आतमध्ये असल्याचे निदर्शनास आले. त्याने बाहेरून कडी लावत दरवाज्याला टाळे लावले. याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी याठिकाणी मोठी गर्दी केली. पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विठोबा सावंत, विजय जाधव, तुषार वाघाटे यांनी घटनास्थळी येत सर्वांसमक्ष दरवाजा उघडला. त्यावेळी टॉयलेटची खिडकी तोडत त्याने पलायन केले. तसेच तात्काळ त्याने नजिकच असलेल्या आपल्या सदनिकेत पाठीमागील खिडकीतून आत जात आश्रय घेतला. पोलिसांनी दरवाजा तोडत त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या अन्य ४ साथीदारांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्यांना समज देऊन सोडण्यात आले.