कुडाळमध्ये शासकीय भात खरेदीसाठी प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये शासकीय भात खरेदीसाठी प्रारंभ
कुडाळमध्ये शासकीय भात खरेदीसाठी प्रारंभ

कुडाळमध्ये शासकीय भात खरेदीसाठी प्रारंभ

sakal_logo
By

68176
कुडाळ ः शासकीय भात खरेदी प्रारंभ करताना तहसीलदार अमोल पाठक. (छायाचित्र ः अजय सावंत)

कुडाळमध्ये शासकीय भात खरेदीसाठी प्रारंभ

१४ केंद्रांत खरेदी सुरू; नोंदणी उद्यापर्यंत, खरेदीसाठी ३१ जानेवारीची मुदत

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः येथे शासकीय भात खरेदी प्रारंभ तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील १४ केंद्रांत भात खरेदी सुरू करण्यात आली आहे. यावेळी मशिनद्वारे भाताची प्रत तपासूनच भात खरेदी केले जाणार आहे. या खरेदीसाठी नोंदणी करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत असून ३१ जानेवारीपर्यंत कुडाळ तालुक्यातील शासकीय भात खरेदी सुरू राहणार आहे, अशी माहिती कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामार्फत देण्यात आली.
या शुभारंभ प्रसंगी कुडाळ तहसील पुरवठा शाखेचे येडके, मुंडे, कुडाळ संघाचे व्यवस्थापक करावडे व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. संस्थेची १४ अधिकृत केंद्रे असून शेतकऱ्यांनी जवळच्या नोंदणी केलेल्या केलेल्या केंद्रावरच आपले भात विक्री करणे आवश्यक आहे. नोंदणी नसेल तर शेतकऱ्यांना भात विक्री करता येणार नाही. नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत आहे.
नोंदणीसाठी स्वतः शेतकरी लागणार असून २०२२-२३ खरीप पीकपेर भात असा ऑनलाईन सातबारा आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड, सुरू असलेले बँक पास बुक, ॲपवर शेतकऱ्याच फोटो घेऊन नोंदणी केली जाणार आहे. भात ओलसर किंवा त्याची ग्रेड तपासण्यासाठी शासनामार्फत डीएमओ सिंधुदुर्ग यांनी मशिन दिल्या आहेत. भात खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत असणार आहे, अशी माहिती कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघामार्फत देण्यात आली.
--
चौकट
खरेदी विक्री संघातर्फे काही सूचना
२०२२-२०२३ या वर्षासाठी क्विंटल शासन दर २९४० रुपये एवढा आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी-विक्री संघामार्फत मोबाईलवर संदेश आला की त्यांनी विक्री केंद्रावर भात घेऊन यायचे आहे. मेसेज किंवा केंद्राचा फोन आल्याशिवाय भात घेऊन जाता येणार नाही. याअंतर्गत ओलसर, टोका लागलेले भात घेतले जाणार नाही, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.