धनगर चषकाचा मान पेढांबेतील रामवरादायिनी संघाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनगर चषकाचा मान पेढांबेतील रामवरादायिनी संघाला
धनगर चषकाचा मान पेढांबेतील रामवरादायिनी संघाला

धनगर चषकाचा मान पेढांबेतील रामवरादायिनी संघाला

sakal_logo
By

rat१३२३.txt

( टुडे पान ३)

फोटो - rat१३p९.jpg ः

६८१९९
चिपळूण ः विजेत्या संघास गौरवताना माजी आमदार चव्हाण, सोबत धनगर समाजाचे पदाधिकारी.

धनगर चषकाचा मान रामवरादायिनी संघाला

पुरुष खुला गट कबड्डी ;मानाई क्रीडामंडळ तळवडे उपविजेते


चिपळूण, ता. १२ः चिपळूण तालुका धनगर समाजाच्यावतीने अलोरे येथे पुरुषांच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रामवरदायिनी क्रीडामंडळ पेढांबे संघाने विजेतेपद पटकावले तर मानाई क्रीडामंडळ तळवडे संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खडपोली येथील सुकाई क्रीडामंडळाने तिसरा आणि आई महाकाली कुंभार्ली संघाने चौथा क्रमांक मिळवला आहे.
जीवन डोंगरदऱ्यात काढणाऱ्या धगनर समाजातील युवकांना खेळातील आनंद मिळावा. त्यांच्यातील ऊर्जा खेळातून स्पर्धेत दिसावी. त्यांच्या नैपुण्यतेला वाव मिळावा. यातून समाज एकवटला जावा. या भावनेतून गेली तीन वर्षे अलोरे येथे जय मल्हार चषक कबड्डी स्पर्धा भरवल्या जात आहेत. स्पर्धेतील अनेक सामने रंतदार झाले. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील खेळाडूंनी तसेच धनगर समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या स्पर्धेत विजेत्या संघासह सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकडपटू, उत्कृष्ट चढाईपटू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी या उपक्रमाला सहकार्य दिले. राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी प्रतापराव शिंदे यांनी स्पर्धेला भेट देत खेळाडूंना मार्गदर्शन केले. यातील काही खेळाडूंची निवड करत त्यांना पुणे अथवा मुंबई येथे प्रशिक्षणासाठी पाठवू. यासाठी येणारा खर्च स्वतः करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आमदार शेखर निकम, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी आदींनी स्पर्धेला हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. बक्षीस वितरणप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष शांताराम येडगे, उपाध्यक्ष परशुराम खरात, रामकृष्ण गोरे, सचिव महादेव, उपक्रम समितीचे अध्यक्ष विनोद वरक, उपाध्यक्ष पाडुरंग शिंगाडे, सचिव चंद्रकात कोकरे, संतोष खरात यांच्यासह संघ आणि समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.