पतसंस्थेची शृंगारतळीत शाखा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतसंस्थेची शृंगारतळीत शाखा सुरू
पतसंस्थेची शृंगारतळीत शाखा सुरू

पतसंस्थेची शृंगारतळीत शाखा सुरू

sakal_logo
By

rat1317.txt

बातमी क्र. 17 ( टुडे पान 3 )
--------------

rat13p22.jpg ः
68222
शृंगारतळी ः खारवी समाजविकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या शृंगारतळी शाखेचे उद्घाटन झाले.

खारवी समाज पतसंस्थेची शृंगारतळीत शाखा

पाच शाखा मंजूर ; लवकरच संस्थेची दुसरी शाखा दाभोळ येथे

शृंगारतळी, ता. 13 ः खारवी समाजविकास नागरी सहकारी पतसंस्थेचा शृंगारतळी शाखा उद्घाटन सोहळा उत्साहात झाला. पतसंस्थेचा पारदर्शक व्यवहारामुळे संस्थेला शृंगारतळी, दाभोळ, खंडाळा, पालशेत, पूर्णगड अशा पाच शाखा मंजूर झाल्या आहेत. यापैकी शृंगारतळी शाखेचे उद्घाटन रविवारी (ता. 11) डिसेंबरला येथील प्रतिष्ठान सोन्या-चांदीचे व्यापारी जय गुहागरकर यांच्या मातोश्री हेमलता शरद गुहागरकर यांच्या हस्ते झाले.
पतसंस्था जिल्हा रत्नागिरी नवीनच असतानाही चार वर्षात 1 कोटी 20 लाख स्वनिधी व सुमारे 8 लाखाचे भागभांडवल उभे करून सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण केला. सलग चार वर्ष पतसंस्थेचा अ वर्ग राखत व शून्य टक्के एनपीए राखत पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. पहिल्या वर्षांपासून सभासदांना लाभांश देणारी, अत्यअल्प थकबाकीचे प्रमाण ठेवण्यात संस्था यशस्वी झाले. कर्ज व ठेवी यांच्या आदर्श प्रमाण ठेवत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देण्याचा पतसंस्थेचा लौकिक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा २०२२ चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार, कोकण विभागातून गट क्र. 1 मध्ये 1 ते 10 कोटी ठेवी असणाऱ्या गटांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार संस्थेला मिळाला आहे. यावेळी वृषाली गुहागरकर, जयशेठ गुहागरकर, पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे, सर्व संचालक मंडळ सदस्य, समन्वय समिती सदस्य, कर्मचारीवृंद, समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेची दुसरी शाखा दाभोळ येथे सुरु करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केला. संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख व संचालक, प्रशासन अधिकारी व समन्वय समितीच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले.
---------------------