सावंतवाडीत १५० जणांची आरोग्य चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत १५० जणांची आरोग्य चिकित्सा
सावंतवाडीत १५० जणांची आरोग्य चिकित्सा

सावंतवाडीत १५० जणांची आरोग्य चिकित्सा

sakal_logo
By

68240
सावंतवाडी : आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन करताना ज्येष्ठ नागरिक नखाबाई खोरागडे. बाजूला मान्यवर.


सावंतवाडीत १५० जणांची आरोग्य चिकित्सा

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंधुमित्र, रासाई मंडळाचा संयुक्त उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शहरातील गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने येथील सिंधुमित्र प्रतिष्ठानने जिमखाना मैदान लाखे वस्ती येथे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री रासाई युवक कला, क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्‍घाटन लाखे वस्तीतील ज्येष्ठ नागरिक नखाबाई खोरागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरास शल्यतज्ज्ञ डॉ. शंकर सावंत, बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत व डॉ. संदीप सावंत, फिजिशियन डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. चेतन परब, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वाती पाटील, जनरल फिजिशियन डॉ. राहुल गवाणकर, डॉ. मुग्धा ठाकरे, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी रुग्ण तपासणी केली.
या शिबिरात ३५ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांची रक्त शर्करा (ब्लड शुगर) तपासणी करण्यात आली. रक्तशर्करा वाढलेल्यांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या शिबिराचा लाभ सुमारे १५० रुग्णांनी घेतला. शिबिरासाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतोष नाईक, नीलेश माणगावकर, भार्गवराम शिरोडकर, आनंद मेस्त्री, आसिफ शेख, भगवान रेडकर, सिध्देश मणेरीकर, अँड्र्यू फर्नांडीस, दीपक गावकर, प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले. तर स्थळाची व्यवस्था श्री रासाई मंडळाचे दीपक लाखे, सागर लाखे, कृष्णा लाखे, गणेश पाटील, विकी लाखे, गणेश खोरागडे आदींनी पार पाडली.
प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांत यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी सहभागी होतात. यावेळी प्रतीक पाटील, प्रशांत, शुभम पावसकर, पांडुरंग सातार्डेकर, लाजरी नाईक, हर्ष, सानिया सारंग, श्रद्धा पारे, अभिज्ञा सावंत व प्रणय पालकर यांनी शिबिर व्यवस्था व प्रशिक्षणात सहभाग घेतला. दीपक व कृष्णा लाखे यांनी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करून भविष्यात असे अनेक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. लाभार्थ्यांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त करून प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.