आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श आचारसंहितेचे 
काटेकोर पालन करा
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

sakal_logo
By

68250
कलमठ : येथील कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शेजारी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, किरण मेथे आदी.

आदर्श आचारसंहितेचे
काटेकोर पालन करा

कांबळे ः कणकवली तालुक्यात गावांना भेटी

कणकवली, ता.१३ : लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व आहे. त्‍याचबरोबर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ देऊ नका. आचारसंहितेचा भंग झालास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुठेही तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.
तालुक्यातील आतापर्यंत २० गावांमध्ये गावभेटी देत श्री. कांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत असणारे उमेदवार व कार्यकर्ते तसेच स्थानिक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, किरण मेथे, आदी उपस्थित होते.
निवडणूक ही लोकशाहीतील एक महत्त्वाची बाब असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत व नियोजित कार्यक्रमानुसार पार पाडण्याकरिता सर्वांनीच सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करत असताना प्रतिस्पर्धी उमेदवारांना चिथावणी न देणे, नियमांचे काटेकोर पालन करणे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. असे प्रतिपादन श्री. कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी पोलिस निरीक्षक श्री हुंदळेकर व श्री खंडागळे यांनीही मार्गदर्शन केले.