प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे विमा पत्र वारसास प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे 
विमा पत्र वारसास प्रदान
प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे विमा पत्र वारसास प्रदान

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे विमा पत्र वारसास प्रदान

sakal_logo
By

६८२७९

टीपः swt१३१९.jpg मध्ये फोटो आहे.


प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे
विमा पत्र वारसास प्रदान
देवगड, ता. १३ ः प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतील वारसास जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. प्रकाश बोडस यांच्या हस्ते दोन लाख रकमेचे विमा पत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
याबाबत जिल्हा बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जिल्हा बँकेच्यावतीने राबविली जाते. या योजनेअंतर्गत चांदोशी येथील एका महिलेचे अपघाती निधन झाले होते. संबंधित महिलेच्या वारसाला जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. बोडस यांच्या हस्ते दोन लाख रकमेचे विमा पत्र बँकेच्या तळेबाजार शाखेत सुपूर्द करण्यात आले. यावेळी बँकेचे खातेदार महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार हायस्कूलमधील राजेश वाळके, माजी मुख्याध्यापक नारायण हिंदळेकर व रवींद्र हिंदळेकर त्याचप्रमाणे नीलेश पारकर आणि वरेरी-तळेबाजार विकास सोसायटीचे अध्यक्ष सदानंद देसाई यांचे अ‍ॅड. बोडस यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तळेबाजार शाखेचे शाखा व्यवस्थापक अजित देवगडकर, कर्मचारी उपस्थित होते.