संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat१३३३.txt

( पान ५)


rat१३p२०.jpg ः
६८२२०
मुंबई ः आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई ः श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२३ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा माजी पर्यटनमंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. कोकणचो मालवणी महोत्सव चारकोप येथे हा कार्यक्रमात झाला. या प्रसंगी आमदार सुनील प्रभू, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, मनाली चौकीदार, शुभदा गुढेकर, शंकर हुंडारे, टेरवचे सुपुत्र आणि युवा सेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम, संतोष राणे, निखिल गुढेकर उपस्थित होते. गेली ११ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे. टेरव गावातील प्रत्येक घरात तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना दिनदर्शिकेचे निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे. देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
---

मुलांना खाऊ वाटप

देवरूख ः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा देवरूख नं. ३ व ४ मधील एक हजार मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, देवरूख शहराध्यक्ष हनिफशेठ हरचिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळूशेठ ढवळे, युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते
--

बने इंटरनॅशनल स्कूलचे यश

देवरूख ः क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रत्नागिरीच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलने यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये १४ आणि १७ वर्षाखालील मुले व मुली यांच्या गटाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये १४ वर्षे वयाखालील मुले व मुली या गटाने बास्केटबॉल स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटाने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकप्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. या १७ वर्षाखालील मुलींच्या गटाची निवड विभागीय स्तरासाठी झालेली आहे. अजिंक्य पाटील, चिन्मय टिपुगडे, प्रक्षालिनी नाईकवाडे यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
---

दादर-रत्नागिरी ट्रेन करावी

रत्नागिरी ः दिवा-रत्नागिरी ही गाडी पूर्ववत दादर-रत्नागिरी करावी आणि तिला (कै.) मधु दंडवते एक्स्प्रेस हे नाव द्यावे, अशी मागणी अशोकराव जाधव, अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र आणि अध्यक्ष शेतकरी-कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांनी केली आहे. ही मागणी जनतेतून सातत्याने येत आहे म्हणून ज्यांना ज्यांना कोकण रेल्वेमध्ये दंडवते यांचे योगदान मान्य आहे अशा सर्वांनी पक्षभेद, मनभेद, मतभेद विसरून दिवा -रत्नागिरी गाडी पूर्ववत दादर-रत्नागिरी गाडी करून गाडीला (कै.) मधु दंडवते एक्स्प्रेस नाव द्यावे अशी मागणी करावी, असे आवाहन अशोकराव जाधव यांनी काँग्रेसतर्फे केले आहे. ही मागणी १८ जानेवारी (कै.) बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीपर्यंत पूर्ण व्हावी ती न झाल्यास जनतेच्यावतीने या गाडीवर नामांतराचे पोस्टर चिकटवण्यात येतील व नामांतर करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.

---