शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करा
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करा

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करा

sakal_logo
By

rat१३३४.txt

बातमी क्र..३४ ( पान ५ )

rat१३p१९.jpg ः
६८२१९

रत्नागिरी ः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, रमेश शहा, वहिदा काझी, रफिक मुल्ला.

शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश रद्द करा

कॉंग्रेस पक्षाची मागणी ; ७०७ जणांचा आंतरजिल्हा बदल्यात समावेश

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १३ ः ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील ७०७ शिक्षकांना अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी शासनाने कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे कार्यमुक्तीचे आदेश रद्द करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २ हजार ४९४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शिक्षकांची ७ हजार २३२ पदे मंजूर असून, त्यापैकी ११५० पदे रिक्त आहेत. ६ हजार १०० शिक्षक कार्यरत आहेत त्यापैकी ७०७ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जाण्याच्या तयारीत आहे. आधीच १५ टक्क्यापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असताना ७०७ शिक्षकांची बदली झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २५ टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
७०७ शिक्षकांना अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी शासनाने कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा परिषदला दिले आहेत. हे आदेश देताना आरटीई ॲक्टचे निकष राज्य शासनाने धाब्यावर बसवण्यात आले आहेत. हा आदेश काढताना शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणताही विचार केलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रिक्त पदांसाठी भरती करावी नंतर त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कार्यमुक्तीचा आदेश रद्द करावा. तसे न केल्यास जिल्ह्यातील पालकांना घेऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी दिला. याबाबतचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही सादर करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश शहा, वहिदा काझी, रफिक मुल्ला व अन्य उपस्थित होते.

कोट ः
राज्य सरकारने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढताना रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या मुलांचा विचार केला असता तर असे फर्मान काढलेच नसते, अशी टीका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केली.