कृषी विद्यापिठाच्या संशोधनास आजपासून मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी विद्यापिठाच्या संशोधनास आजपासून मान्यता
कृषी विद्यापिठाच्या संशोधनास आजपासून मान्यता

कृषी विद्यापिठाच्या संशोधनास आजपासून मान्यता

sakal_logo
By

दापोली कृषी विद्यापीठात
आज समितीची बैठक
दाभोळ, ता. १३ ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची ५०वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे १४ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत चारही कृषी विद्यापिठाद्वारे करण्यात आलेल्या संशोधनास मान्यता देण्यात येणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून मागील चार दशकांच्या कालावधीमध्ये विद्यापिठाने विविध पिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या १०९ जाती विकसित केल्या आहेत. यंत्रे व अवजारे २४ विकसित केल्या आहेत. याचबरोबर पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित १ हजार २२४ शिफारशी शेतकऱ्यांना आणि विस्तार कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, कृषि अभियांत्रिकी तसेच मत्स्यशाखा यामध्ये महत्वपूर्ण संशोधन करून कोकणचा आर्थिक विकास साधण्यास मदत केली आहे. यावर्षी विद्यापीठामार्फत प्रसारणासाठी वरी या पिकाचा १ वाण (कोकण सात्विक) आणि तंत्रज्ञान शिफारशी ४४ सादर होणार आहेत.