
हातिसमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम
rat१३४०.txt
( पान ५)
rat१३p३१.jpg-
६८२५२
रत्नागिरी ः हातिस गावातील प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी.
हातिसमध्ये विद्यार्थ्यांचे गुणदर्शन
रत्नागिरी, ता. १३ ः हातीस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने २०२२-२३ या वर्षात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. भैरी जुगाईदेवीचा गोंधळाचा धार्मिक कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमार्फत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला.
यामध्ये विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी १९ नृत्याचे कार्यक्रम साजरे केले. मनिषा कीर आणि अंकिता नागवेकर यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले होते. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. प्रकाशयोजना रूपेश नार्वेकर, ध्वनी जबाबदारी महेश कीर यांनी सांभाळली. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध भजनीबुवा सुदेशबुवा नागवेकर आणि विठोबा उर्फ बावा श्रीधर नागवेकर यांनी काम पाहिले. यातील प्रथम चार क्रमांकाना पारितोषिक देऊन शतक महोत्सवाचे सांगता समारंभात गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि बाबरशेख नाट्यमंडळाचे दिग्दर्शक विजय (बबन) नागवेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.