कारवांचीवाडी येथे ट्रक- दुचाकीचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारवांचीवाडी येथे ट्रक- दुचाकीचा अपघात
कारवांचीवाडी येथे ट्रक- दुचाकीचा अपघात

कारवांचीवाडी येथे ट्रक- दुचाकीचा अपघात

sakal_logo
By

कारवांचीवाडी येथे ट्रक- दुचाकीचा अपघात
रत्नागिरीः रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर कारवांचीवाडी येथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शैलेश गोपाळ करंड (रा. निवळी, रत्नागिरी) जखमी झाला असून, उपचारासाठी खासगी रुग्ण्यालयात दाखल केले आहे. ग्रामीण पोलिसात संशयित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताहीर नसरूद्दीन वस्ता (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १२) दुपारी दीडच्या सुमारास रत्नागिरी हातखंबा रस्त्यावर नुरानी गादी कारखान्यासमोर कारवांचीवाडी येथे घडली.
-------
चाकाळे मारहाणप्रकरणी पाचजणांना जामीन
खेडः तालुक्यातील चाकाळे येथे ६ डिसेंबरला झालेल्या मारहाणप्रकरणी खेड पोलिसांनी अटक केलेल्या पाच संशयितांना खेड न्यायालयात शुक्रवारी (ता. ९) डिसेंबरला हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. यामध्ये पंकज प्रसाद वाडकर, सागर प्रकाश कदम, सुमित संदीप बर्गे, सुदर्शन संतोष पार्टे व अक्षय संतोष पार्टे यांचा समावेश आहे. या प्रकरणी रोहन खेडेकर या युवकाने खेड पोलिसात तक्रार दिली होती. तालुक्यातील चाकाळे येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात मंगळवारी (ता. ६) रात्री सव्वादोनच्या सुमारास रोहन खेडेकर या युवकाला मारहाण झाली होती.
------------
घरडाला गंडा घालणाऱ्याला इंदूरमध्ये अटक
चिपळूणः लोटे येथील प्रसिद्ध घरडा केमिकल्स कंपनीकडून अॅग्रो केमिकलची ९२ लाखाची उत्पादने घेऊन पोबारा करणाऱ्या अशोक जैस्वाल (रा. मध्यप्रदेश) याला खेड पोलिसांनी इंदूर रेल्वेस्टेशनवर सापळा रचून अटक केली. त्याला सध्या पोलिस कोठडी देण्यात आली आहे. लोटे येथील घरडा केमिकल्स कंपनी ही अॅग्रो केमिकलचे उत्पादन करते. देशभरात मागणीनुसार उत्पादने पुरवली जातात त्यासाठी काही डिस्ट्रिब्यूटर काम करतात. त्याचपैकी अशोक जैस्वाल हा एक डिस्ट्रिब्यूटर म्हणून काम करत होता; परंतु त्याने २०१८ पासून उत्पादने घेऊन कंपनीचे ९२ लाख रुपये थकवले. त्यानंतर खेड पोलिसात तक्रार केल्यानंतर खेड पोलिस त्याच्या शोधात होते; परंतु अनेकवेळा त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. त्याच्या मोबाईल डाटावरून त्याचा शोध सुरू ठेवला होता. अशोक हा इंदूर रेल्वेस्टेशनवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळतात खेड पोलिसांनी खास पथक तयार करून त्याला इंदूर रेल्वेस्थानकात अटक करून खेड येथे आणण्यात आले.
----------
भावकी वादाची परस्परविरोधी तक्रार
दाभोळः दापोली तालुक्यातील शिरसोली येथे १० डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास जाधव भावकीच्या बैठकीत झालेल्या वादाचे पर्यवसान दापोली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यापर्यंत गेले आहे. या बैठकीचा विषय मधलीवाडी येथील गटार व पाखाडीचे बांधकाम करणे या संदर्भात होता. या वेळी वाद होऊन अरविंद जाधव यांना सुनील जाधव, संतोष जाधव व गणेश जाधव यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तर सुनील जाधव यांनी त्यांच्या नाकाचा चावा घेतल्याची तक्रार अरविंद जाधव यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिल्यावर या तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सुनील जाधव यांनीही अरविंद जाधव यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अरविंद जाधव यांनी आपल्याला धक्काबुक्की केली, शिवीगाळ करून आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेऊन दुखापत केल्याची तक्रार सुनील जाधव यांनी दापोली पोलिसात दाखल केली असून, संशयित अरविंद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.