गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पकडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पकडली
गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पकडली

गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पकडली

sakal_logo
By

rat१३४६.txt

( पान ३ )

बैलाची बेकायदा वाहतूक वाहन ताब्यात

दोघांवर गुन्हा दाखल ; एक संशयित शिवसेनेचा नेता
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण-कराड मार्गावरील अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यासमोर गोवंशची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली. या कारवाईत भगवान कोकरे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. खबरदेखील त्यांनी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात शिवसेनेच्या एका माजी पंचायत समिती सदस्याचा समावेश आहे. ही कारवाई काल (ता. १२) सायंकाळी करण्यात आली. रघुनाथ बाबू ठसाळे (रा. धामेली, ता. चिपळूण), दयानंद दत्ताराम जाधव ( कालुस्ते, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की भगवान कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोफळी येथून कीर्तनसेवा संपवून चिपळूणकडे घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर एका गाडीतून चिपळूण ते पाटण अशी गोवंशची वाहतूक होत आहे. अशी माहिती मिळाली. यानुसार ते पिंपळीखुर्द येथे थांबून संबधित वाहनाची वाट पाहत होते. काही वेळाने ती गाडी तेथी आली. त्यांनी याची माहिती अलोरे-शिरगाव पोलिसांना दिली. गाडीच्या पाठीमागून अलोरे पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यांनी गाडीची तपासणी केली. त्यामध्ये दोन बैल आढळून आले; मात्र, रघुनाथ ठसाळे यांनी आपल्याकडे गोवंश वाहतुकीचा परवाना असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी बैलांची वैद्यकीय तपासणी केली आहे का? असे विचारले असता त्यांनी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. यावर तत्काळ कोकरे यांनी पशुसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे यांना फोन करून खात्री केली. यातील कोणीही बैलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आले नसल्याचे त्यानी सांगितले. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव चालू असल्याने शासनाने संपूर्ण राज्यात प्राण्यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. असे सांगितले. तरीही दोघा संशयितांनी बैलांची कोणती वैद्यकीय तपासणी न करता परजिल्ह्यात बैलाची वाहतूक केली असल्याचे या फिर्यादीत कोकरे यांनी नमूद केले आहे.अधिक तपास अलोरे-शिरगाव पोलिस करत आहेत.