
वासुदेव कोरगावकर यांचे निधन
68307
वासुदेव कोरगावकर
सावंतवाडी, ता. १३ ः साळगाव-मेस्त्रीवाडी येथील वासुदेव कोरगावकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आयुर्विमा महामंडळ कुडाळ येथील निवृत्त कर्मचारी महादेव कोरगावकर यांचे ते वडील होत.
..............
68308
सखाराम गावकर
आचरा, ता. १३ : आचरा-गाऊडवाडी येथील सखाराम दाजी गावकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहीण, भाचे असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सॉलिसीटर वकील शिल्पन गावकर यांचे ते वडील होत.
..............
68309
राकेश तोडकर
आचरा, ता. १३ : चिंदर बाजार येथील राकेश रविकांत तोडकर (वय ३७) यांचे काल (ता. १२) निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. ओम साई मित्रमंडळाचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते.
..............
सुभाष खोत
मालवण, ता. १३ : माळगाव-बागायत येथील सुभाष सहदेव खोत (वय ८०) यांचे निधन झाले. मालवणी बाजारचे कर्मचारी गणेश खोत, महेश खोत यांचे ते वडील, तर बागायत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मूर्तिकार प्रवीण धामापूरकर यांचे सासरे होत.