मांडकुली-फौजदारवाडीतील एकाचा शेतविहिरीत मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडकुली-फौजदारवाडीतील
एकाचा शेतविहिरीत मृतदेह
मांडकुली-फौजदारवाडीतील एकाचा शेतविहिरीत मृतदेह

मांडकुली-फौजदारवाडीतील एकाचा शेतविहिरीत मृतदेह

sakal_logo
By

मांडकुली-फौजदारवाडीतील
एकाचा शेतविहिरीत मृतदेह
कुडाळ, ता. १३ ः मांडकुली-फौजदारवाडी येथील श्रीकृष्ण मसूरकर (वय ४८) यांचा मृतदेह शेतविहिरीत आढळून आला. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात श्रीपाद मसुरकर (रा. फौजदारवाडी) यांनी खबर दिली.
त्यांनी पोलिसांत दिलेली माहिती अशी ः श्रीपाद मसुरकर यांचे काका श्रीकृष्ण मसूरकर हे एकटेच राहत होते. त्यांची पत्नी मुलग्यासह गेली १० वर्षापासून माहेरी राहत आहे. श्रीकृष्ण मसुरकर यांना दारूचे व्यसन होते. ते दोन दोन दिवस आजुबाजुच्या गावात, परिसरात फिरत असतात. त्यावेळी ते घरी येत नाहीत. काल (ता.१२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरीच होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ते दिसले नाहीत. दुसऱ्या दिवशी घरी येतील, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची शोधाशोध केली नाही. त्यानंतर आज गावचे पोलीस पाटील अमित मराठे यांनी सकाळी पावणे नऊच्या सुमारास घरी येऊन सांगितले की, श्रीकृष्ण मसुरकर यांचा मृतदेह मांडकुली पेडणेकरवाडी येथील शेत विहीरीत दिसून आला आहे. त्यानंतर घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी जात पंचनामा केला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.