संक्षिप्त-कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ नूतन अध्यक्षपदी वराडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ
नूतन अध्यक्षपदी वराडकर
संक्षिप्त-कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ नूतन अध्यक्षपदी वराडकर

संक्षिप्त-कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ नूतन अध्यक्षपदी वराडकर

sakal_logo
By

कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ
नूतन अध्यक्षपदी वराडकर
मालवण ः कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची २०२१-२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. नूतन अध्यक्ष म्हणून अजयराज वराडकर यांची निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त म्हणून कर्नल शिवानंद वराडकर व अॅड. सोनू पवार यांची निवड केली. ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून डॉ. विश्वनाथ वराडकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, संचालक सुधीर वराडकर, शिवराम गुराम, सुप्रिया वराडकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, महेश वाईरकर. सल्लागार मंडळ ः अॅड. ऋषी देसाई, सुहास वराडकर, व्हिक्टर डॉन्टस, संतोष साटविलकर, प्रभाकर वाईरकर, दीपक पेणकर यांची निवड करण्यात आली.

कोळंबमध्ये १६ ला कार्यक्रम
मालवण ः कोळंब-भटवाडी येथील कुलदेवी भवानी माता मूर्ती प्रतिष्ठापना जीर्णोद्धार सोहळा १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत सद्‍गुरू सदानंद गवाणकर यांच्या निवासस्थानाशेजारी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त १६ रोजी धार्मिक विधी, १७ रोजी व्यासकर्म, रौप्यायज्ञकर्म, १८ रोजी देवतास्थापना, कलशारोहण, दुपारी १ नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.