मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा

sakal_logo
By

rat१३५०.txt

बातमी क्र. ५० ( पान ३ )

फोटो - ratchl१३५.jpg ः
६८२९९
चिपळूण ः उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन देताना आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा

चिपळुणात मागणी ; आंबेडकरी चळवळीतील संघटना

चिपळूण, ता. १३ ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे विधान करून चंद्रकांत पाटील यांनी मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय वर्गाच्या क्रांतीविरांना अवमानित व चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी येथील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष, संघटनांनी निवेदनाद्ववारे केली आहे.
आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, रिपब्लिकन पक्ष कांबळे गट, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, बौद्धजन पंचायत समिती, बहुजन समाज पार्टी आदी पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे हे निवेदन दिले.