
परराज्यांतील मटार बाजारात
परराज्यांतील मटार बाजारात
तुर्भे, ता. १३ : परराज्यांतून बाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. मंगळवारी (ता.१३) पंजाब, अमृतसर, मध्य प्रदेशातून वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीमार्केटमध्ये ३,४५० क्विंटल मटार दाखल झाल्याने किरकोळ बाजारात ४० ते ८० रुपयांना विक्री होत आहे. लांबलेल्या पावसाने भाज्यांची आवक रोडावली होती; आता ती सुरळीत होत असून भाज्यांचे वाढलेले दर पूर्ववत होत आहेत. अशातच बाजारात मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि आपल्या राज्यांतून काही प्रमाणात हिरवा मटार येत आहे. किरकोळ बाजारात मटारचे दर तीस ते चाळीस रुपये किलोवर आले आहेत. कार्तिकी एकादशीनंतर पंजाब, उत्तर प्रदेशमधूनही आवक होणार येणार असल्याने दर आणखी खाली उतरतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
गृहिणींमध्ये समाधान
महिनाभरापूर्वी १०० रुपयांचा दर मटारची आवक वाढल्याने ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. मात्र आता बाजारात वाटण्याच्या ३५ ते ४० गाड्या येऊ लागल्या असल्याने मटारचे दर ३० ते ४० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे गृहिणींकडून समाधान व्यक्त होत आहे.
भावात घसरण होणार
सध्या स्थानिक परिसरातून अत्यल्प प्रमाणात भाजीपाला, फळभाज्या विक्रीला येत आहे, परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्या विक्रीस येत आहेत. पंजाब, मध्य प्रदेशातून हिरवा मटार पुढील काळात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.