विभागीय थ्रो बॉल स्पर्धेचे सिंधुदुर्गनगरीत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय थ्रो बॉल स्पर्धेचे
सिंधुदुर्गनगरीत उद्‍घाटन
विभागीय थ्रो बॉल स्पर्धेचे सिंधुदुर्गनगरीत उद्‍घाटन

विभागीय थ्रो बॉल स्पर्धेचे सिंधुदुर्गनगरीत उद्‍घाटन

sakal_logo
By

68429
सिंधुदुर्गनगरी : थ्रो बॉल स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी डॉ. जयकृष्ण फड, विद्या शीरस, प्रशांत सातपुते आदी.

विभागीय थ्रो बॉल स्पर्धेचे
सिंधुदुर्गनगरीत उद्‍घाटन
ओरोस ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आजपासून येथील क्रीडा संकुलात विभागीय थ्रो बॉल स्पर्धांना सुरुवात झाली. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळाडूंच्या या स्पर्धा होत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी उद्‍घाटन प्रसंगी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, कोल्हापूर थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष दशरथ माने, महाराष्ट्र थ्रो बॉल संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सहसचिव सुरेश हादीमनी, सिंधुदुर्ग थ्रो बॉल संघटनेचे सचिव सुनील भाटीवडेकर, कोल्हापूर थ्रो बॉलचे संचालक भरत कुंभार, थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे उपस्थित होते.
---
68465
सिंधुदुर्गनगरी ः संदीप राठोड यांचा सत्कार करताना माहिती अधिकारी प्रशांत सातपुते.

संदीप राठोड यांना पदोन्नती
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा माहिती कार्यालयातील लिपिक संदीप राठोड यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली झाली. त्यानिमित्त आज कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. राठोड २०१३ पासून जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. कार्यालयातील अनेक कामे कुशलतेने पार पाडली. शांत व सुस्वभावी कर्मचारी म्हणून ते सुपरिचित आहेत. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी राठोड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी उपसंपादक रणजित पवार, लिपिक रवींद्र देवरे, वाहनचालक अमित राणे, शिपाई महेंद्र भालेकर, कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे सेवा निवृत्त लेखापाल चंद्रकांत कारिवडेकर उपस्थित होते.
---
68426
सावंतवाडी : यशस्वी विद्यार्थिनीसमवेत शिक्षक वृंद.

गोळाफेक स्पर्धेत मसियाचे यश
सावंतवाडी ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा पंचम खेमराज विद्यालय, बांदा येथे शालेय मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये गोळाफेक स्पर्धेत १७ वर्षांखालील विद्यार्थी गटात येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या नववीतील मसिया आल्मेडा या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली. मसियाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, क्रीडाशिक्षिका मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात मुंबई संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेशागोळ, पर्यवेक्षक मारिया पिंटो आदींनी मासियाचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

68464
कासार्डे ः आरोग्य शिबिराचा गरजूंनी लाभ घेतला.

कासार्डे येथे आरोग्य चिकित्सा
तळेरे : सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त जीवनविद्या मिशन भांडुप शाखेच्यावतीने ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत कासार्डे-भोगले पारकरवाडी येथे आरोग्य शिबिर नुकतेच झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन श्री दत्त सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये डॉ. संदीप साळी, डॉ. विशाल नलावडे, डॉ. शाम राणे, डॉ. नेमिनाथ खोत, डॉ. पूनम जगदाळे यांच्यासह श्री दत्त सेवा मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. जीवनविद्या मिशनच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील एक असलेले ग्रामसमृद्धी अभियानातून गावाच्या विकासासाठी गावात अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी, तरुण मुले यांना मार्गदर्शन व कौटुंबिक मार्गदर्शन केले जाते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाते.
..................
68430
सावंतवाडी ः महिमा म्हाडगूत यांना मदत देताना डॉ. परुळेकर.

सामंत ट्रस्टची रुग्णाला मदत
सावंतवाडी ः येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होममध्ये डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते वाडोस येथील महिमा म्हाडगुत या दुर्धर आजारग्रस्त महिलेला सामंत ट्रस्टतर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. म्हाडगुत यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना आर्थिक मदतीची गरज ओळखून आर्थिक मदत देण्यात आली. यापुढेही गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येईल, असे डॉ. परुळेकर यांनी सांगितले.
...............
शिरवल येथे आज जत्रौत्सव
कणकवली ः शिरवल (ता.कणकवली) येथील ग्रामदैवत श्री.लिंगरवळनाथ देवाचा वार्षिक जत्रौत्सव उद्या (ता. १५) रवळनाथ मंदिर येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री बाराला रवळनाथ मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा, रात्री बारानंतर चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक दशावतारी प्रयोग सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मानाच्या ओट्या भरल्यानंतर माहेरवाशीणींच्या ओट्या भरण्यात येणार आहेत. या जत्रौत्सवासाठी मुंबईहून चाकरमानी आणि माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणावर येतात.