प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप; उपोषण करण्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप;
उपोषण करण्याचा इशारा
प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप; उपोषण करण्याचा इशारा

प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप; उपोषण करण्याचा इशारा

sakal_logo
By

प्रतिज्ञापत्रावरील आक्षेप;
उपोषण करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः वारस जिवंत असताना वडिलोपार्जित जमिनीला चुकीच्या शपथेवर प्रतिज्ञापत्र दाखल करून दिशाभूल, फसवणूक केल्याबाबत संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी; अन्यथा २३ ला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आरोंदा येथील सूर्यकांत नाईक यांनी दिला आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना नाईक यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून घेतल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. सावंतवाडी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी एक पत्र पाठविले आहे. मृताच्या वारसांनी ते कायदेशीर वारस असल्याबाबतचे वारस प्रमाणात घेऊन अर्ज सादर करावा, असे त्यांनी कळविले असून ते संतापजनक आहे. तहसीलदारांनी प्रतिज्ञापत्राची चौकशी टाळून चुकीचे ठरेल, असे काम केले आहे. त्यामुळे येत्या २२ पर्यंत न्याय न मिळाल्यास २३ ला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.