इन्सुलीतील शिवसैनिक कृष्णा सावंत भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीतील शिवसैनिक
कृष्णा सावंत भाजपमध्ये
इन्सुलीतील शिवसैनिक कृष्णा सावंत भाजपमध्ये

इन्सुलीतील शिवसैनिक कृष्णा सावंत भाजपमध्ये

sakal_logo
By

68445
कणकवली ः आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत कृष्णा सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

इन्सुलीतील शिवसैनिक
कृष्णा सावंत भाजपमध्ये
बांदा, ता. १४ ः इन्सुलीतील ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा सावंत यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे इन्सुलीत शिवसेनेला धक्का मानला जात आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, निवृत्त पोलिस निरीक्षक अशोक सावंत, भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस विकास केरकर, शक्तिकेंद्र प्रमुख नितीन राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, माजी सोसायटी चेअरमन हरिश्चंद्र तारी, ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर राणे आदी उपस्थित होते. सावंत हे २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेत कार्यरत होते. माजी उपसरपंच, पोलिस पाटील, सोसायटी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते इन्सुली माऊली देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष आहेत.