जिल्ह्यातील 2,923 लाभार्थींना गोवरची लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील 2,923 लाभार्थींना गोवरची लस
जिल्ह्यातील 2,923 लाभार्थींना गोवरची लस

जिल्ह्यातील 2,923 लाभार्थींना गोवरची लस

sakal_logo
By

rat१४८.TXT

(टुडे पान १ साटई)

तीन हजार लाभार्थीना गोवरची लस

जिल्ह्यात दोन टप्प्यात मोहीम ; लसीकरणासाठी प्रशासन सज्ज
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १४ ः राज्यात गोवर आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर या आजाराचे दुरीकरण करण्याचे उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी २०२३ दोन टप्प्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ९२३ लाभार्थींना लस दिली जाणार आहे.
गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरापासून लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या स्थानिक आशा आणि आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत तयार करण्यात येणार आहेत. २६ जानेवारी २०२३ पर्यंत या बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चार आठवड्याच्या अंतराने दोन मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष लसीकरण सत्राचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठकही नुकतीच झाली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले, साथीच्या पार्श्वभूमीवर आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येऊन नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी मोहिमेसाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. लसीकरणापासून वंचित बालकांच्या पालकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सीईओ पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.


गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेतील लाभार्थी संख्या अशी ः

- पहिला डोस अपेक्षित लाभार्थी १२००
- दुसरा डोस अपेक्षित लाभार्थी ११००
- ड्रॉप आऊट लाभार्थी ३१३
- लेफ्ट आऊट लाभार्थी ३१०
-----------------------------------------
- एकूण लाभार्थी २९२३
-------------------------------------------