शिबीरातून मानसिक स्वास्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिबीरातून मानसिक स्वास्थ
शिबीरातून मानसिक स्वास्थ

शिबीरातून मानसिक स्वास्थ

sakal_logo
By

rat१४२.txt

(टुडे पान ४ साठी)

एनएसएस शिबिरातून मानसिक स्वास्थ्य

चिपळूण ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनएसएससारखे उपक्रम आवश्यक आहेत. एनएसएसच्या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये समाजभान विकसित होऊन व्यक्तिगत व सामाजिक संबंध कसे जोपासावेत याचे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. आर्थिक भवितव्यापेक्षा आवश्यक असणारे सामाजिक व मानसिक स्वास्थ्य एनसीसीच्या शिबिरातून मिळत असल्याचे मत डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी व्यक्त केले. या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचा सांगता समारोह ३ डिसेंबरला झाला. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव तळप यांनी त्यांच्या मनोगतामध्ये स्वातंत्र्य, समता, आर्थिक, न्याय व सामाजिक न्याय हे घटक सर्वांग सुंदर विकासासाठी आवश्यक असून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरार्थी विद्यार्थ्यांमध्ये हे गुण विकसित होत आहेत, असे मत व्यक्त केले. निवासी शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल चैतन्य कुलकर्णी, सुमित कदम, प्राची तांबे व फातिमा खान या चार विद्यार्थ्यांची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा सन्मान करण्यात आला.
---

अलोरे येथे रक्तदान शिबिर

चिपळूण ः राष्ट्रवादीचे काँगेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अलोरे येथील डॉ. रणजित पाटील यांच्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी अलोरे पंचकोशीतील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक युवा व ज्येष्ठ व्यक्तींनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिरात मंदार एज्युकेशन सोसायटी यांचा सहभाग होता.
----

असुर्डे विद्यालयात क्रीडा महोत्सव सुरू

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोल या विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाचे उद्घाटन शालेय समितीचे चेअरमन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ सदस्य रघुनाथ राऊत, मुख्याध्यापक फुटक उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी खेळ खेळत असताना आपली खेळातील कौशल्ये दाखवावीत. खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करावे तसेच शिस्त बाळगावी, असे आवाहन केले. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक पांढरे यांच्या नियोजनानुसार या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
---
क्रीडा महोत्सव उत्साहात

चिपळूण ः परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक विभागाचा संस्थांतर्गत क्रीडा महोत्सव नुकतेच प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शालेय समिती अध्यक्षा वैशाली निमकर, संस्थेचे संचालक अभय चितळे उपस्थित होते. चारही शाळांतील खेळाडू प्रतिनिधींच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मैदानाभोवती फिरवण्यात आली. स्पर्धेमध्ये कबड्डी, लंगडी, रिले हे सांघिक खेळ तर १०० मीटर धावणे, सॅक जम्प हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, संस्थेचे पदाधिकारी विजयकुमार ओसवाल, सुधीर तलाठी, सुनील जोशी, विवेक संसारे उपस्थित होते. या महोत्सवामध्ये प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय व प्राथमिक विद्यालय अलोरे या दोन्ही शाळांनी समान गुण मिळवून मानाची फिरती ढाल मिळवली. समान गुण मिळाल्याने दोन्ही शाळांना समान कालावधीसाठी फिरती ढाल विभागून देण्यात आली.
---
शिवाजी माध्यमिक विद्यालयाला विजेतेपद

साडवली ः नवभारत हायस्कूल भरणे खेड या ठिकाणी पार पडलेल्या १७ वर्षे मुली जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील मुलींनी अंतिम सामन्यात खेड तालुक्याला पराभूत करून अंतिम विजेतेपद पटकावले. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक देवीदास कुळये यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव जाधव, मुख्याध्यापक राऊत व सर्व शिक्षक पालक यांनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---

किरडवकर यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

गावतळे ः दापोली तालुक्यातील सडवे नं. १ शाळेतील आणि सध्या वावघर शाळेत कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक प्रमोद किरडवकर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल जनकल्याण सामाजिक संस्थेने घेतली. कोल्हापूर येथे झालेल्या विनोबा भावे राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलनात माजी आमदार संपतबापू पाटील, हभप भगवान खोखरे महाराज आणि संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक किरडवकर यांनी २६ वर्षाच्या सेवेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गुणवत्तापूर्ण अध्यापन करून मुलांना शिस्तीचेही धडे दिले. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेसाठीही त्यांचे अनमोल योगदान लाभले आहे.
---