मोती तलावासाठी आता स्वाक्षरी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोती तलावासाठी 
आता स्वाक्षरी मोहीम
मोती तलावासाठी आता स्वाक्षरी मोहीम

मोती तलावासाठी आता स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By

68432
बबन साळगावकर

मोती तलावासाठी
आता स्वाक्षरी मोहीम

बबन साळगावकर ः अधिकाऱ्यांमुळेच काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः शहरातील निसर्गसंपन्न मोती तलावाची कोसळलेली भिंत बांधण्यास होणारा विलंब म्हणजे अधिकाऱ्यांचा मुजोरपणाच आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग याची कोणतीच दखल घेत नसल्याने याच्या निषेधार्थ १७ ला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तलावाच्या भिंतीचे काम सुरू झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, येथील मोती तलावाची भोसले उद्यान परिसरात भिंत कोसळून गेले सात-आठ महिने उलटले आहेत. दिवसेंदिवस हा भाग आणखीनच खचत चालला आहे. त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सर्वांकडून होत आहे. अनेकांनी आंदोलने, उपोषणे छेडण्याचा इशाराही दिल्यानंतर निधीअभावी काम रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत मी दोन आठवड्यापूर्वी बांधकामच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता कामासाठी निधी प्राप्त झाला असून लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. यावरून अधिकाऱ्यांची मुजोरी प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर १७ ला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या निर्णयाला माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरू, ‘सामाजिक बांधिलकी’चे अध्यक्ष रवी जाधव, राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर, दिलीप पवार, मनवेल फर्नांडिस, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणकर आदींनी पाठिंबा दिला आहे.