वक्तृत्व स्पर्धेत जोशी, आरावंदेकर प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धेत जोशी, आरावंदेकर प्रथम
वक्तृत्व स्पर्धेत जोशी, आरावंदेकर प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत जोशी, आरावंदेकर प्रथम

sakal_logo
By

68481
मळगाव ः विजेत्या स्पर्धकांसोबत उपस्थित मान्यवर.

वक्तृत्व स्पर्धेत जोशी, आरावंदेकर प्रथम

मळगावमध्ये उपक्रम; खानोलकर वाचनालयाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी गटात योगेश जोशी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) याने, तर आठवी ते दहावी गटात श्रावणी आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
पाचवी ते सातवी गटात अस्मी मांजरेकर (राणी पार्वतदेवी हायस्कूल, सावंतवाडी), विभव राऊळ (मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. दीप्ती सावंत (कुडाळ हायस्कूल) व शमिका आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते गटात आर्या सातोसकर (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा), प्राची सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. समृद्धी गवस (मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव) व रामदास मोर्ये (श्रीरंग लाडकोबा देसाई विद्यालय, पाट) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक मंडळ उपस्थित होते. परीक्षक चंद्रकांत सावंत, भरत गावडे, सुमेधा सावंत, पत्रकार नीलेश मोरजकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले. कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक पृथ्वीराज बांदेकर यांनी आभार मानले.