चिपळुणात आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी ट्रेनिंग कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी ट्रेनिंग कॅम्प
चिपळुणात आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी ट्रेनिंग कॅम्प

चिपळुणात आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी ट्रेनिंग कॅम्प

sakal_logo
By

rat१४१७.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-ratchl१४२.jpg ः
६८४५१
चिपळूण ः आशासेविकांना माहिती देताना रोटरीचे पदाधिकारी.
---
चिपळुणात आशासेविका, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

चिपळूण, ता. १४ ः रोटरी क्लब ऑफ चिपळूण व वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात प्रशिक्षिण शिबर घेण्यात आले. यामध्ये तालुक्यातील १२० आशा सेविका व अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता.
रोटरीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक पराग बांद्रे यांनी प्रास्ताविक केले. रोटरीच्या विविध पदाधिकाऱ्यांमार्फत पाहुण्यांचे स्वागत केले गेले. त्यानंतर अध्यक्ष संजीव नायर यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. चिपळूण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी रोटरी क्लब ऑफ चिपळूण व वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे आभार मानले. वालावलकर रुग्णालयाचे डॉ. गजानन वेल्हाळ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कवटेकर यांनी दातांसंदर्भात योग्य ती निगा कशी राखावी व दातांची निगा न राखल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे सांगितले. डॉ. विकास नातू यांनी बाळाचे संगोपन कसे करायचे व काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सेविकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. त्यानंतर माधवबागच्या डॉ. राधा मोरे यांनी मधुमेह संबंधित माहिती व सेविकांच्या शंकाचे निरसन केले. वालावलकर रुग्णालयाच्या डॉ. प्रज्वलित कटरे, डॉ. आकांशा मारू, डॉ. शिवांजली शर्मा, डॉ. पूजा वनकट यांनी आशासेविकांना मार्गदर्शन केले. डॉ. स्वाती सोनवणे यांनी मानसशास्त्राची माहिती देऊन रूग्णांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला रोटरीचे आसिफ पठाण, रमण डांगे, सुनील रेडीज व प्रशांत देवळेकर उपस्थित होते.