ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार ऑनलाइन
ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार ऑनलाइन

ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार ऑनलाइन

sakal_logo
By

rat१४१९.txt

(पान ५ साठीमेन)

ग्रामपंचायतीचे दाखले मिळणार ऑनलाइन

महा ई-ग्राम कनेक्ट अॅप ; ८४६ ग्रामपंचायतीमध्ये सहा हजार अर्जांसाठी नोंदणी
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १४ ः शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अॅप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलवर ग्रामपंचायतमधील सर्व दाखले मिळणार आहेत. यासाठी घरबसल्या अर्ज करून हे दाखले मिळवता येणार आहेत. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील हजारो ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना ऑनलाइन घरबसल्या विविध प्रकारचे दाखले परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा-ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप विकसित केले आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवेसाठी आता घरातूनच अर्ज करता येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा जन्मदाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्तेसंबंधीचे उतारे तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा करायचा असल्यास आता ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-ई ग्राम सिटिझन कनेक्ट अॅप सुरू केले आहे. नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावर विविध दाखल्यासाठी वारंवार खेपा माराव्या लागतात; मात्र आता या अॅपमुळे दाखल्यासाठीचे हलपाटे आता बंद होणार आहेत. जिल्ह्यात आजवर याची ८४६ ग्रामपंचायतीमध्ये ६ हजार १६५ अर्जांसाठी नोंदणी केली आहे.


...असे इन्स्टॉल करायचे अॅप

प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड केल्यावर त्यात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी ही माहिती भरून नोंदणी करावी. युजर नेम आणि पासवर्ड प्राप्त होईल. त्यानंतर जे दाखले हवेत ते यात नमूद करावेत.

कोट
शासनाने महा-ई ग्राम अॅप सुरू केल्याने ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीत वारंवार खेटे मारावे लागणार नाहीत. यासाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो.
-सुयोग पवार, जिल्हा व्यवस्थापक


ऑनलाइन नोंदणी झालेल्या ग्रामपंचायती आणि अर्ज
तालुका* ग्रामपंचायत* नोंदणी

मंडणगड* ४९* ४२७
दापोली* १०६* ८३१
खेड* ११४* ६६७
चिपळूण* १३०* १०४५
गुहागर* ६६* ४८८
संगमेश्वर* १२६* ९७४
रत्नागिरी* ९४* ४४५
लांजा* ६०* ६४०
राजापूर* १०१* ५४८