रत्नागिरी- संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढतच राहील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढतच राहील
रत्नागिरी- संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढतच राहील

रत्नागिरी- संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढतच राहील

sakal_logo
By

rat14p8.jpg
68420
रत्नागिरीः केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या संस्कृत शिक्षणकेंद्राच्या अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमात बोलताना रामराजे चांदणे. सोबत आचार्य विशाल भट्ट, डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढतच राहील
रामराजे चांदणे; विश्वविद्यालयाच्या संस्कृत अभ्यासक्रमाचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. १४ः साध्य, साधन आणि सिद्धता या तत्त्वावर आपण जीवन जगत असतो; परंतु आपल्याला साधनांचा मोह जडतो. सिद्धतेपर्यंत पोहोचलो की साधने सोडवली जात नाहीत. शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी हे ज्येष्ठ विद्यार्थी आले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहील, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.
नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चालू आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन व मागील परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, केंद्राच्या प्रमुख आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये व शिक्षक आचार्य विशाल भट्ट उपस्थित होते.
संगीत विशारद, इतिहास, हिंदीचा गाढा अभ्यास असणारे व मुळचे उस्मानाबाद येथील वारकरी चांदणे हे कीर्तनकार असल्याने त्यांनी अनेक दाखले देत संस्कृतची महती आणि आपण कसे जगावे याबद्दल विवेचन केले. हसतखेळत आणि प्रबोधन करत त्यांनी व्याख्यान दिले. चांदणे म्हणाले, जोपर्यंत यश समाधानाच्या पातळीवर उतरत नाही तोपर्यंत जगण्याला अर्थ नाही. राग आवरा, संयम बाळगा कारण, अनेकांना शाब्दिक विजयाचा आनंद वाटतो; पण तो चुकीचा आहे. नशीब व मेहनतीची किल्ली एकदम लावली की यश मिळतेच. आपण समाजाप्रती मदत दिली पाहिजे, याची जाणीव ठेवा. या वेळी संस्कृत विभागप्रमुख आणि अनौपचारिक संस्कृत शिक्षणकेंद्राच्या अधिकारी डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविकामध्ये अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राविषयी माहिती दिली. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी निवेदन केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले.

चौकट
संस्कृत शब्द लिहा
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, महाविद्यालय संस्कृतची चळवळ राबवत आहे. अभ्यास, वाचन, बोलण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना संगणकावर संस्कृतमधून टायपिंगचे प्रशिक्षण द्यावे. त्यातून संस्कृतचा प्रचार, प्रसाराचे काम आणखी वाढेल. महाविद्यालयात संस्कृतचा शब्द लिहून त्या खाली मराठीतील शब्दसुद्धा लिहिला तर विद्यार्थ्यांचाही शब्दसंग्रह वाढेल.